HW News Marathi
महाराष्ट्र

कावळ्याच्या शापाने गुरं मरत नाहीत,अजित पवारांचा निलेश राणेंना सणसणीत टोला!

पुणे | गेल्या अनेक दिवसांपासून भाजप नेते निलेश राणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर ट्विट करत टीका करत आहेत. त्यांच्या या टीकेवर आज अजित पवार यांनी त्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. “कावळ्याच्या शापाने गुरं मरत नसतात, त्यांचं नाव घेऊन अधिक महत्त्व कशाला द्यायचं”, असं म्हणत अजित पवारांनी राणेंच्या ट्विटला प्रतिउत्तर दिलं आहे. पुण्यात आज (५ फेब्रुवारी) प्रसारमाध्यमांशी अजित पवार संवाद साधत होते.

काय म्हणाले होते निलेश राणे?

अजित पवार आपल्याला टोपी लावून गेले, त्या माणसाबद्दल बोलायला नको, असं म्हणत त्यांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला होता. आपल्या शपथविधीला येणारा माणूस, शपथविधीला येतो, उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतो. आमदार टिकत नव्हते म्हणून हात जोडून परत निघून जातो, त्याच्यासोबतच्या आमदारांना चोरासारखे धरून शरद पवार साहेबांसोबत उभं केलं जाते, तोच माणूस भाजपवर टीका करतो आणि आपण सहन करायची का, असा सवाल उपस्थित करत माजी खासदार निलेश राणेंनी अजित पवारांवर निशाणा साधला होता. रत्नागिरीत प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हा टोला लगावला होता.

इतकंच नाही तर त्यांनी एक ट्विट करत अजित पवारांना पुन्हा नॉटरिचेबल होण्याची वेळ आल्याचे ट्विट केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये असं लिहिलं आहे की,,अजित पवारांना कधी मुख्यमंत्री होता आले नाही व ते कधी होणार नाहीत पण कसंतरी उपमुख्यमंत्रीपद मिळालं होतं पण आता २ उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळणार अशी चर्चा आहे म्हणजे अजित पवार यांची परत नॉटरिचेबल होण्याची वेळ आली. काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद मिळालच पाहिजे, तो त्यांचा अधिकार आहे’.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘पुण्यात अंगणवाडी सेविकांचे मोबाईल परत आंदोलन’, तत्कालीन मंत्री पंकजा मुंडेंच्या चौकशीची मागणी!

News Desk

“आपण शरद पवार साहेबांच्या तालमीत तयार झाल्या आहात, त्यामुळे दिशाभूल करू नये” – अमोल मिटकरी

News Desk

माझा मराठवाडा, माझे नांदेड आणि माझा महाराष्ट्र या भूमिकेतून विकासाला न्याय देऊ! – अशोक चव्हाण

Aprna