मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी पदभार स्वीकारला आहे. महाविकासआघाडीच्या सरकारला आज (३० नोव्हेंबर) दुपारी २ वाजता बहुमता चाचणी होणार आहे. यासाठी विधानसभेचे दोन दिवसीय अधिवेशन बोलविण्यात आले आहे. त्यापूर्वीच नांदेड भाजपचे खासदार प्रताप चिखलीकर यांनी आज सकाळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या मुंबईतील चर्चगेटमधील प्रेमकोर्ट या निवासस्थानी भेट घेणार आहे. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
Ajit Pawar,NCP on BJP MP Prataprao Chikhalikar met him today morning: It was just a courtesy meet ,even if we are from different parties we all have relations with each others,no discussion on floor test. As Sanjay Raut said,our alliance will prove our numbers today in the house pic.twitter.com/O1JUQbzNFf
— ANI (@ANI) November 30, 2019
या भेटीसंदर्भात अजित पवार यांनी पत्रकारांनी विचारणा केल्यानंतर ते म्हणाले की, गैरसमज करु नका, प्रताप पाटील चिखलीकर भाजपमध्येच आहेत, मी राष्ट्रवादीतच आहे, आम्ही केवळ सदिच्छा भेट म्हणून भेटलो, विश्वासदर्शक ठरावाची अजिबात चर्चा नाही, तो ठराव लाईव्ह असेल, असे अजित पवार यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले आहे. अजित पवार पुढे म्हणाले की, संजय राऊतांनी सांगितल्याप्रमाणे १७० चा आकडा गाठू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अजित पवार यांनी शनिवारी (२३ नोव्हेंबर) भाजपशी हातमिळवणी करत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला होता. यानंतर राज्याच्या राजकारणाने वेगळे वळण घेतले आहे. मात्र, ४ दिवसात अजित पवारांची मनधरणी केल्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत. अवघ्या भाजपचे सरकार पाडले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.