HW News Marathi
महाराष्ट्र

“अजितदादा, जयंत पाटील, मुनगंटीवार, विखे-पाटील आणि मला चित्रपटात भूमिका द्या”- गिरीश महाजन

जामनेर। गिरीश महाजन हे जळगाव जिल्ह्यात कोणत्या ना कोणत्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून देणारं वक्तव्य करत असतात. आणि नेहमी चर्चेत असतात. आता चक्क एका निर्मात्याला सिनेमात काम देण्याची गळच घातली. बरं एकट्यासाठी सिनेमात काम मागतील ते महाजन कसले? महाजन यांनी चक्क उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील आणि राधाकृष्ण विखेपाटील यांनाही सिनेमात घेण्याची विनंती निर्मात्याला केली. तर तुमच्यासाठी तर इंग्रजी सिनेमाच बनवावा लागेल असं सांगून निर्मात्यानेही महाजन यांची विकेट घेतली. त्यामुळे चांगलीच या वक्तव्याची चर्चा होते.

उद्या पक्षाने जर आम्हाला उमेदवारी दिली नाही तर आम्हाला चित्रपटात भूमिका दया

जामनेर येथे ‘हलगट’ या सिनेमाच्या पोस्टरचे प्रमोशन माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी या चित्रपटाचे निर्माते बाबुराव घोंगडे यांनाच थेट गळ घातली. अजित पवार, सुधीर मुनगंट्टीवार, जयंत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील आणि माझी आता आमदारकीची सहा टर्म झाली आहे. त्यामुळे उद्या पक्षाने जर आम्हाला उमेदवारी दिली नाही तर आम्हाला चित्रपटात भूमिका दया, अशी मागणी महाजन यांनी एका चित्रपट निर्मत्याकडे केली. तीस वर्षे आमदारकीची झाली आहेत. पक्ष एकाच व्यक्तीला किती वेळा संधी देणार? त्यामुळे पक्षाने आम्हाला उमेदवारी नाही दिली आणि आम्ही रिटायर झालो तर भविष्यात आम्हालाही सिनेमात काम करण्याची संधी द्यावी, असं महाजन म्हणाले.

कुटुंबीयांच्याच नावे कंपन्या

सुनेत्रा पवार या दोन डझन कंपन्यांमध्ये डायरेक्टर आहेत. तर तीन डझन कंपन्यांमध्ये भागधारक मालक आहेत. बहिणी, मुलगा, यजमान त्यांचा मुलगा यांच्या नावेही बेनामी कंपन्या आहेत. हे आधी एक होल्डिंग कंपनी तयार करतात, मग त्याच्या खाली कंपन्या या करतात. सरकारी मालमत्ता कवडीमोल दरात विकत घेतात. पवार कुटूंबियांसाठी राज्याची जमीन चमकणारी आहे. जरंडेश्वर कंपनी यांचीच आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक यांचीच आहे. पदाचा दुरूपयोग करून त्यांनी हे सर्व मिळवलं आहे. उपमुख्यमंत्री स्वत:चा कारखाना विकत घेतात. यांचेच बिल्डर कंपन्या विकत घेतात, असा दावाही त्यांनी केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“तेव्हा काय तुम्ही नागपुरी बांगड्या भरल्या होत्या का?”, रोहिणी खडसेंनी भाजप आमदाराला सुनावले

News Desk

केंद्राच्या EWS आरक्षणामध्ये राज्य सरकारला बद्दल करता येणार नाही – गुणरत्न सदावर्ते

News Desk

MPSC ची परीक्षा होणार की नाही ? मोठी आणि महत्वाची बातमी

News Desk