HW News Marathi
महाराष्ट्र

टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद

मुंबई | टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद आहेत. काल 12 एप्रिल 2020 ला राज्यात 64 गुन्हे नोंदविण्यात आले असून 34 जणांना अटक करण्यात आली आहे. 11 वाहने जप्त करण्यात आली असून 18 लाख रुपये किमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर 24 मार्च ते 12 एप्रिल पर्यंत पूर्ण टाळेबंदी कालावधीमध्ये राज्यात 2 हजार 447 गुन्हे नोंदविण्यात आले असून 971 जणांना अटक करण्यात आली आहे. 126 वाहने जप्त करण्यात आली असून 5 कोटी 89 लाख रुपये किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

राज्यातील ‌ सर्व मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद असून अवैध मद्य निर्मिती, वाहतूक, विक्री विरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाची राज्यस्तरावर निरंतर कारवाई सुरूच आहे. अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्री विरुद्ध तक्रार स्वीकारण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाचा 24×7 नियंत्रण कक्ष सुरू आहे . सदर नियंत्रण कक्षाचा टोल फ्री क्रमांक 18008333333 तर व्हाट्सअँप क्रमांक 8422001133 आहे. यावर तक्रारदार आपली तक्रार नोंदवू शकतात. तक्रार करणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येते. सदर नमूद क्रमांकावर अवैध मद्य बाबतची तक्रार नोंद करण्यात यावी, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत करण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आरक्षण प्रश्नी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मोदींच्या भेटीला, अजित पवार आणि अशोक चव्हाणही असणार उपस्थित

News Desk

‘साकीनाका बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या मुलांना वाऱ्यावर सोडणार नाही’!, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

News Desk

ठाकरे नाव लावून कोणी बाळासाहेब होत नाही नितेश राणेंची मुख्यमंत्र्यांवर जहरी टीका!

News Desk