HW News Marathi
Covid-19

शासकीय रुग्णालयांमध्ये कोरोनाच्या सर्व चाचण्या अन् उपचार मोफत

मुंबई | कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासकीय रुग्णालयांमध्ये कोरोनाच्या सर्व चाचण्या आणि उपचार मोफत करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती, राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे. “कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अखत्यारितील शासकीय वैद्यकीय, दंत महाविद्यालये व रुग्णालयांमध्ये कोरोनाच्या सर्व चाचण्या आणि उपचार निशुल्क करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे”, असे ट्विट अमित देखमुख यांनी केले आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे निश्चितच सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे यापूर्वी आर्थिक अडचणीमुळे कोरोनाची टेस्ट करण्यासाठी पुढे न येणारे लोक आता स्वतः पुढे येऊन कोरोनाची तपासणी करून घेण्यास तयार होतील. त्याचप्रमाणे, कोरोनासंदर्भात उपचार घेताना सर्वसामान्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागणार नाही. त्यांच्यावर योग्य ते उपचार देखील होतील. त्यामुळे अधिकाधिक लोकांच्या चाचण्या होण्यास आणि अधिकाधिक लोक उपचार घेऊन कोरोनमुक्त होण्यास मदत मिळेल. कोणीही आर्थिक अडचणीच्या भीतीपोटी आपला हा आजार लपवून ठेवणार नाही. म्हणूनच राज्य सरकारचा हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरतो.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात कोरोनाचा कहर! पुढचे ४ आठवडे महत्वाचे

News Desk

अंतिम वर्षाच्या परीक्षेचा निर्णय आता १० ऑगस्ट ला होणार !

News Desk

कोरोना परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळल्याबद्दल मुंबई महापालिकेचं नीती आयोगाकडून कौतुक

News Desk