मुंबई | महाविकास आघाडी सरकारची महत्त्वाकांक्षी शिवभोजन योजनेला काल पासून (२६ जानेवारी) राज्यभरात सुरूवात झाली. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते तर मुंबईत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या योजनेचे उद्घाटन केले. राज्य सरकारच्या या योजनेवर मनसेने मात्र टीका केली आहे. राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मनीषा नगरमधील शिवभोजन योजनेचे उद्घाटन करून जेवणाचा आनंद लुटला होता. त्याची माहिती आव्हाड यांनी ट्विटर अकाउंटवरून शेअर केली होती.
आज मनीषा नगर येथील नागरिकांसाठी "शिवभोजन" योजनेचे उदघाटन केले व मी स्वतः भोजनाचा स्वाद घेतला.
गरीब व गरजू जनतेला फक्त दहा रुपयात दर्जेदार आहार भेटावं. हेच आमच्या महाविकास आघाडी सरकारचे उद्दिष्ट आहे.@OfficeofUT @PawarSpeaks @CMOMaharashtra pic.twitter.com/YUNBUyrzCQ
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 26, 2020
दरम्यान, मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी या कार्यक्रमाचा फोटो ट्वीट करत जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधला आहे. “१० रुपयाच्या थाळीसोबत २० रुपयांची बिसलेरी पिणारा गरीब माणूस!”, अशा खोचक शब्दांत खोपकरांनी जितेंद्र आव्हाडांवर टीका केली आहे. आव्हाडांचा फोटो शेअर करत टेबलावर ठेवलेल्या बिसलेरीच्या पाण्याच्या बॉटलवरुन त्यांनी टिका केली.
१० रुपयाच्या थाळीसोबत २० रुपयांची बिसलेरी पिणारा गरीब माणूस ! 😢 pic.twitter.com/kmuCGq3PfX
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) January 27, 2020
गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवरून माहिती देताना म्हटले होते की, आज मनीषा नगर येथील नागरिकांसाठी “शिवभोजन” योजनेचे उदघाटन केले व मी स्वतः भोजनाचा स्वाद घेतला. गरीब व गरजू जनतेला फक्त दहा रुपयात दर्जेदार आहार भेटावं. हेच आमच्या महाविकास आघाडी सरकारचे उद्दिष्ट आहे. आव्हाडांच्या या ट्विटचा दाखला देत मनसेने त्यांच्यावर टीका केली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.