HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यातील तणावपूर्ण परिस्थितीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया!


मुंबई। राज्यात आज संपूर्ण दिवसभर वातावरण चांगलंच चिघळला आहे. त्रिपुरात झालेल्या घटनेवरून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आणि आता या सगळ्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून या राज्यात आपण सर्वजण गुण्यागोविंदाने नांदत आहोत. मात्र, काही विघ्नसंतोषी लोकांना हे पाहवत नाही. त्यामुळे वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा लोकांपासून सावध राहिले पाहिजे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.कर्जत-जामखेड मतदारसंघात आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारातून होत असलेल्या विविध विकासकामांचे भूमिपूजन पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी जामखेडमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सार्वजनिक बांधकमंत्री अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे आमदार तसेच पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

आंदोलनासाठी भडकावले जात आहे

यावेळी बोलताना पवार म्हणाले, ‘त्रिपुरा येथील घटनेचे पडसाद उमटून मालेगाव, नांदेड, अमरावती येथे जे प्रकार सुरू आहेत, ते समाजकंटक आणि विध्वंसक वृत्तीच्या लोकांनी घडवून आणले आहेत. ज्यांना चांगले चालले बघवत नाही, असे लोक हे प्रकार करतात. मात्र, याचा फटका सामान्यांना बसतो. राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान होते. यासाठी तरुणांचा वापर केला जातो. त्यामुळे तरुणांनी अशा गोष्टींना बळी पडता कामा नये. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या बाबतीतही हेच सुरू आहे. एसटीला साठ वर्षे होऊन गेली आहेत. आम्हालाही वाटते की कर्मचाऱ्यांचे भले व्हावे. जे शक्य आहे, ते आम्ही करीत आलो आहोत. तीही आपलीच माणसे आहेत. शिवाय प्रवाशांचाही विचार करावा लागणार आहे. असे असताना त्यांना आंदोलनासाठी भडकावले जात आहे. आता त्यांनीच विचार करावा की त्यांचे हित कशात आहे. आम्ही तर जे शक्य आहे, ते करणारच आहोत. सध्या काहींचे फसवे राजकारण सुरू आहे. असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर टीका केली आहे. लोकांना त्रास होईल, या पद्धतीने राजकारण केले जात आहे. आतापर्यंत ज्या गोष्टी घडल्या नव्हत्या, त्या राज्यात घडत आहेत. त्यामुळे राज्यातील सुज्ञ जनतेने आता यावर विचार केला पाहिजे. असं उपमुख्यमंत्री म्हणाले.

सरकारने गांभीर्याने घ्याव

त्रिपुरा येथील घटनेच्या निषेधार्थ अमरावती जिल्ह्यात मोर्चे काढण्यात आले. या मोर्चांनी वेगळेच वळण घेतले आहे. त्यात हिंदूंची घरे जाळजी जात आहेत. दुकाने टार्गेट केली जात आहेत. सोशल मीडियावर टाकलेल्या चुकींच्या फोटोमुळे हे मोर्चे काढण्यात येत आहेत. हे थांबायला हवे. शांतता राखणे गरजेचे आहे, असे आवाहनही त्यांनी यावेळी बोलताना विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. फडणवीस म्हणाले की, त्रिपुरामध्ये मशीद तोडल्याचे आणि जाळल्याचे फोटो प्रसिद्ध करण्यात आले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या चुकीच्या फोटोमुळे हे आंदोलन करण्यात येत आहे. हे आंदोलन पेटवण्याचा प्रयत्न होत आहे. या घटनेचा आम्ही निषेध करतो. न घडलेल्या घटनेवरून होणाऱ्या आंदोलना हा प्रकार सरकारने गांभीर्याने घ्यावा.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून राजकीय कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या नको,देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

News Desk

भिडेंच्या वक्तव्याचा पुणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉक्टर सेलकडून निषेध

News Desk

केंद्राने वेळीच पावलं उचलली असती तर वीजनिर्मितीवर प्रश्नचिन्ह नसतं, शिवसेनेची टीका!

News Desk