HW News Marathi
महाराष्ट्र

आरोग्यमंत्र्यांनी खोलवर माहिती न घेता RTPCR किट्सवर वक्तव्य केले – अमित देशमुख 

जालना | राज्यात कोरोनाच्या चाचणीसाठी सदोष आरटी पीसीआर किट्स वितरित झाल्याची कबुली आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. यासंदर्भात बोलताना खोलवर माहिती न घेता राजेश टोपेंनी वक्तव्य केल्याचं म्हणत वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सदोष पीसीआर किट्स प्रकरणी एका समितीची स्थापना केली असून याचा अहवाल आल्यावर कारवाई केली जाणार असल्याचं अमित देशमुख यांनी म्हटल आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आघाडी सरकारमधील २ नेत्यांच्या मतात तफावत असल्याचे समोर आले आहे.

राज्य सरकारने खरेदी केलेल्या कोरोना तपासणीच्या १२ लाख ५० हजार किट्स या सदोष आढळून आल्या होत्या. मात्र या सर्व किट्स वैद्यकीय शिक्षण संचालयानं खरेदी केल्या असल्याचं म्हणत टोपेंनी हात झटकले होते. त्यावर आज अमित देशमुखांनी नाराजी व्यक्त केली आहे. टोपेंनी खोलवर माहिती न घेता हे वक्तव्य केले असल्याचे अमित देशमुख यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले होते आरोग्यमंत्री राजेश टोपे?

राज्यात कोरोनाच्या चाचणीसाठी सदोष आरटी पीसीआर किट्स वितरित झाल्याची कबुली काही दिवसांपूर्वी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. आरटी पीसीआरच्या तब्बल १२ लाख ५० हजार किट्स सदोष आढळल्या असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली होती. राज्य सरकारने खरेदी केलेल्या GCC Biotech Ltd कंपनीच्या किट्स सदोष असल्याचा रिपोर्ट एनआयव्हीने दिल्याचंही ते म्हणाले होते. या किट्सची खरेदी वैद्यकीय संचालनालयाकडून करण्यात येते. सदोष किट्स वितरित करणाऱ्या GCC Biotech ltd कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची आवश्यकता असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी अधोरेखित केलं होतं. तसेच GCC Biotech Ltd या कंपनीच्या किट्सचा वापर तातडीने थांबवण्यात आला असून सदोष किट्सचा पुरवठा करणाऱ्या या कंपनीवर कारवाई करणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अशा संख्यावाचनाने गणित सोप्पं होणार कि अवघड ?

News Desk

देवेंद्र फडणवीस आज साताऱ्यात पूरग्रस्त भागाचा आढावा घेण्यासाठी रवाना!

News Desk

विधीमंडळात मुख्यमंत्र्यांसह इतर ८ आमदारांनी घेतली शपथ

News Desk