HW News Marathi
महाराष्ट्र

अमित शाहांचा शिवसेनेला छुपा संदेश? भाजप-सेना एकत्र येण्याचे पुन्हा संकेत?

शिवसेनेने भाजपसोबतची युती तोडून महाराष्टात राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली. आणि यानंतर आता तब्बल दीड वर्षांनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेवरून निशाणा साधला. काल सिंधुदुर्गात नारायण राणे यांच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी अमित शाह बोलत होते. यावेळी “बाळासाहेबांच्या सर्व सिद्धांतांना तापी नदीत बुडवून शिवसेनेने सत्ता मिळवली. पण आम्ही तुमच्या मार्गाने चालणार नाही.

आम्ही तुमच्या मार्गावर चाललो असतो तर शिवसेनाच उरली नसती”, असे अत्यंत टीका अमित शहा यांनी शिवसेनेवर केली. तर दुसरीकडे सत्तास्थापनेमध्ये शिवसेना-भाजपमध्ये झालेल्या मतभेदांवर अमित शहांनी थेट भाष्य करून एक स्पष्ट राजकीय संदेश दिला आहे. तो असा कि,अमित शाह हे फडणवीसांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत आणि येत्या काळात महाराष्ट्राचे राजकारण बदलणारा ठरला, तर आश्चर्य वाटू नये.

कारण, भाजप आणि शिवसेनेत आताच्या घडीला संबंध मोठ्या प्रमाणात ताणले गेलेले असले तरीही हे दोन्ही पक्ष येत्या काळात कधीही एकत्र दिसणार नाहीत असे म्हणणं घाईचं ठरले. त्यामागे काही तशीच कारणं आहेत. ती कोणती ? पाहूया

सारखी विचारधारा

शिवसेना हा भाजपचा तब्बल २५ वर्षे जुना मित्रपक्ष होता. कितीही मतभेद झाले तरी शिवसेना आणि भाजपची युती कायम होती. एकत्र सत्तेत असताना शिवसेना भाजपवर एखाद्या विरोधी पक्षासारखी कडव्या टीका करत होती. मात्र, तरीही तत्त्वांच्या आधारावर नेहमीच शिवसेना-भाजप एकत्र राहिले. मुख्यमंत्रीपदाबाबतच्या वचनाच्या मुद्द्यावरून शिवसेनेच्या संयमाचा कडेलोड झाला आणि त्यानंतर शिवसेनेने एक मोठं पाऊल उचलत राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली. या काळातही शिवसेने आणि भाजपच्या नेत्यांनी एकमेकांवर कमी टीका केलेल्या नाहीयेत. अत्यंत टोकाचं राजकारण आणि घट्ट मैत्री इतकंच हाडवैर या दोन्ही पक्षांमध्ये पाहायला मिळालं. मात्र, थोड्याच दिवसांपूर्वी भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलेले एक वक्तव्य पुन्हा यानिमित्ताने आठवायला हवे कि, “शिवसेना आणि भाजप हे शेवटच्या श्वासापर्यंत शत्रू असणार नाहीत”

शरद पवारांचा देवेंद्र फडणवीसांना तीव्र विरोध

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा भाजपचे महाराष्ट्रातील मोठे नेते असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना तीव्र विरोध आहे. शरद पवार हे देवेंद्र फडणवीसांच्या पूर्णपणे विरोधात आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जेव्हा राष्ट्रवादी आणि काँग्रेसला गळती लागली होती आणि भाजप सर्वशक्तिशाली पक्ष दिसत होता तेव्हा फडणवीसांनी शरद पवारांनी खूप कमी लेखले होते. “मी कुस्तीच्या रिंगणात आहे पण समोर पैलवानच दिसत नाहीत” आणि “शरद पवारांचं राजकारण आता संपलं” या सारख्या बोचऱ्या विधानांनी फडणवीसांनी पवारांना थेट डिवचले. पवारांनीही त्यांना प्रत्युत्तर दिले होते आणि विधानसभेनंतर जे झालं ते अनपेक्षित होतं.

जे आपण सगळ्यांनी पाहिलं. एकंदर “आपल्यालासमोर आव्हानच नाही” हा अविर्भाव एकीकडे पवारांना खटकणं साहजिक आहेच. आता एकीकडे शरद पवार फडणवीसांच्या पूर्णपणे विरोधात किंवा त्यांच्यावर तीव्र नाराज आहेत हे माहित असतानाच दुसरीकडे अमित शहांनी कालच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांच्या राज्यातील स्थानाला बळकटी दिली म्हणजे अप्रत्यक्षपणे हा शरद पवारांना दूर लोटण्याचा प्रयत्न असू शकतो. आणि जर भाजपकडून शरद पवारांना दूर लोटण्याचा प्रयत्न होतोय तर शिवसेनेला हा छुपा संदेश असू शकतो.

दुसरीकडे, विधानसभेदरम्यान निघालेला अडीच-अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाचा मुद्दा सोडला तर थेट फडणवीसविरोधी अशी शिवसेनेची भूमिका दिसलेली नाही. विशेषकरून शिवसेना-भाजपमध्ये जी कटुता निर्माण झाली ती विधानसभेनंतरच. मात्र तुलनेनं शरद पवार आणि फडणवीस यांच्यात असलेल्या कटुतेपेक्षा शिवसेना-फडणवीस यांच्यातील कटुता कमीच आहे, असे दिसून येते.

त्यामुळे, वरवर अमित शहांनी फडणवीसांचे राज्यात बळकट केलेले स्थान शिवसेना-भाजपचे एकत्र येण्याचे संकेतही असू शकतात, हे नाकारता येऊ शकत नाही. म्हणूनच, एकंदरच सद्यस्थिती जर पाहिली तर शिवसेना-भाजपचा एकत्र येण्याचा आशा सध्यातरी दिसत नसल्या तरी शिवसेना- भाजप भविष्यातही कधीच एकत्र येणार नाहीत, हे म्हणणे घाईचं होईल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बार्शी कृषी उत्पन बाजार समिती घोटाळा प्रकरणी संचालकासह १०१ जणांवर गुन्हा दाखल

News Desk

शिवसेनेची ७० उमेदवारांची पहिली यादी जाहीर, वांद्रे पूर्व जागेसाठी घोषणा नाही

News Desk

उर्मिलांकडून पंकजांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!, “पंकजा म्हणाल्या चला भेटू…”

News Desk