मुंबई । राजस्थान विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या नेतृत्त्वात लढली जाईल आणि त्या पुन्हा एकदा पूर्ण बहुमताने मुख्यमंत्रिपदी विराजमान होतील, अशी घोषणा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केली. राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात भाजप पुन्हा एकदा सत्तेत येईल आणि २०१९ ला नरेंद्र मोदीच पंतप्रधान होती, असा दावाही त्यांनी केला.
Maharashtra welcomes you Mananiya Rashtriya Adhyaksh Shri @AmitShah ji !
भारतीय जनता पार्टीचे मा. राष्ट्रीय अध्यक्ष श्री अमित शाहजी यांचे महाराष्ट्रात हार्दिक स्वागत ! pic.twitter.com/NMMxVumi3I
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 22, 2018
अमित शहा यांचा आज रविवार २२ जुलै रोजी एक दिवसीय मुंबईत दाखल झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले आहे. यानंतर आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीबाबत भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांनाही भेटणार असल्याचे समजत आहे. भाजपने लोकसभेची जोरदार तयारी सुरू केली आहे. पंतप्रधान मोदी हे ऑगस्ट महिन्यात उत्तर प्रदेशात पाच जाहीर सभा घेणार आहेत. अमित शहांचाही दौरा सुरू असून शनिवारी ते निवडणूक तयारीसाठी राजस्थानमध्ये होते.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

previous post