HW Marathi
देश / विदेश महाराष्ट्र मुंबई राजकारण

अर्णब गोस्वामींना अटक म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला! अमित शाहांचा ठाकरे सरकार निशाणा

मुंबई । मुंबई पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीचे संपादक पत्रकार अर्णब गोस्वामी यांना आज (४ नोव्हेंबर) ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या कारवाईमुळे भाजपमधील वातावरण तापलं असून खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.अमित शाह यांनी ट्विट करत या कारवाईबाबत नाराजी व्यक्त केली आहे. “काँग्रेस आणि त्यांच्या सहकारी पक्षांनी पुन्हा एकदा लोकशाहीला लाज आणली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरच्या या हल्ल्याचा निषेध व्हायला हवा”, असे ट्विट अमित शाह यांनी केले आहे

पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्यावर ठाकरे सरकारने केलेल्या कारवाईबाबत निषेध व्यक्त करताना अमित शाह म्हणतात की, “काँग्रेस आणि त्यांच्या सहकारी पक्षांनी पुन्हा एकदा लोकशाहीला लाज आणली आहे. सत्तेचा दुरूपयोग करून रिपब्लिक टिव्ही आणि अर्णब गोस्वामीला केलेली अटक हा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि चौथ्या स्तंभावर केलेला हल्ला आहे.
सध्याची परिस्थिती ही आणीबाणीसारखी आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरच्या या हल्ल्याचा निषेध व्हायला हवा.”

 

Related posts

काँग्रेसला आघाडीसाठी विचारुन थकलो पण काँग्रेस दादच देत नाही !

News Desk

आधार क्रमांकाद्वारे पॅन क्रमांक मिळवणे होणार शक्य

rasika shinde

ठाकरे-पवारांच्या विमान प्रवासाची चर्चा

News Desk