HW News Marathi
महाराष्ट्र

उत्तर महाराष्ट्रात भाजपचे बुरुज ढासळण्याच्या धास्तीने केंद्र सरकारकडून हे दबावतंत्र, खडसेंच्या ईडी चौकशीवर मिटकरींची प्रतिक्रिया

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीकडून चौकशीची नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.भाजपची ही हुकूमशाही सुरु आहे. ईडीची नोटीस ही सूडबुद्धीने देण्यात आली आहे, असा आरोप अमोल मिटकरी यांनी केला आहे.खडसेंमुळे उत्तर महाराष्ट्रात भाजपचे बुरुज ढासळायला लागले आहेत. त्या धास्तीने केंद्र सरकारकडून हे दबावतंत्र वापरले गेले आहे, असं मिटकरी म्हणाले.आता महाराष्ट्राच्या जनतेलादेखील माहिती पडलंय, कशाप्रकारे यंत्रणांचा चुकीचा फायदा घेऊन भाजपचे लोकं धिंगाणा घालत आहेत. लोकांना हे जवळपास लक्षात आलं आहे, असं अमोल मिटकरी यांनी सांगितलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीकडून चौकशीची नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांनी अद्याप मला ईडीची नोटीस मिळाली नसल्याचे सांगितले आहे. ही नोटीस मिळाल्यानंतर मी स्वत:ची भूमिका स्पष्ट करेन, असे त्यांनी म्हटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ईडी’ने ३० डिसेंबरला एकनाथ खडसे यांना चौकशीसाठी पाचारण केले आहे. मात्र, ‘ईडी’ला नक्की कोणत्या प्रकरणात एकनाथ खडसे यांची चौकशी करायची आहे, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात ‘ईडी’ला एकनाथ खडसे यांच्याविरुद्ध नक्की कोणते पुरावे मिळाले आहेत, याविषयी चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान, हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ खडसे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आरक्षणावरुन धनगर समाज आक्रमक, लवकर निर्णय घ्या अन्यथा संघर्ष अटळ!

News Desk

आढळराव-पाटील ठाकरे सरकारवर भडकले ! ‘या’गोष्टीचा केला तीव्र शब्दांत निषेध

News Desk

सुनिल पाटीलला आयुष्यात भेटलो नाही, तो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता नाहीच – नवाब मलिक

News Desk