मुंबई | वरळी इथल्या संपर्क कार्यालयात काल (१३ जुलै) भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी राजीनामे दिलेल्या ७७ पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी सगळ्यांचे राजीनामे नामंजूर केले आणि सगळ्यांचं मार्गदर्शन केलं. यावेळी बोलताना त्यांनी महाभारताचा उल्लेख केला. त्यांच्या या वक्तव्यावरून अनेक राजकारणी आपली मतं मांडत आहेत. दरम्यान राष्ट्रवादीचे अकोल्यातील आमदार अमोल मिटकरी यांनी पंकजा मुंडे यांना सल्ला दिला असून नरो वा कुंजरोवा होऊ देऊ नका असं म्हटलं आहे. अमोल मिटकरी यांनी ट्वीट केलं असून या धर्मयुद्धात तुम्हाला अश्वत्थामा बनवल्या गेलं असल्याचं म्हटलं आहे.
ताई तुमच्या पक्षात पंख छाटणारा शकुनी मा.मु. मोठा चतुर आहे
पंकजा मुंडेंच्या महाभारताच्या उदाहरणावरून अनेक राजकारणी आता आपली मतं मदत असून वेगवेगळे तर्क वितर्क काढत आहेत. “ताईंनी आज कौरावांना चांगलंच झोडपलं. ताई तुमच्या पक्षात पंख छाटणारा शकुनी मा.मु. मोठा चतुर आहे हे विसरू नका. या धर्मयुद्धात तुम्हाला अश्वत्थामा बनवलं गेलंय. मामु सोबत डोक्याला तेल लावलेले धर्मराज व पोरी पळवून नेणारे दुःशासन पण आहेत. नरो वा कुंजरोवा होऊ देऊ नका,” असं ट्वीट अमोल मिटकरी यांनी केलं आहे.
ताईंनी आज कौरावांना चांगलंच झोडपलं. ताई तुमच्या पक्षात पंख छाटणारा शकुनी मा.मु. मोठा चतुर आहे हे विसरू नका. या धर्मयुद्धात तुम्हाला अश्वत्थामा बनवल्या गेलंय. मामु सोबत डोक्याला तेल लावलेले धर्मराज व पोरी पळवून नेणारे दुःशासन पण आहेत.
"नरो वा कुंजरोवा होऊ देऊ नका.@Pankajamunde— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) July 13, 2021
काय म्हणाल्या पंकजा मुंडे?
कार्यकर्त्यांशी संवाद साधताना कौरव, पांडवाच्या युद्धाचा उल्लेख करत पंकजा यांनी पक्षांतर्गत राजकारणावर बोट ठेवलंय. पाच पांडव का जिंकले कारण त्यांच्याकडे संयम होता. जो चांगला असतो तो युद्ध टाळण्याचा प्रयत्न करतो. मी धर्मयुद्ध टाळण्याचा प्रयत्न तेव्हापर्यंत करते जेव्हा पर्यंत शक्य आहे. आम्ही कुणालाच भीत नाही. मी कुणाचा निरादार करत नाही. मी माझ्यापेक्षा वयाने मोठ्या माणसाचा आदर करते. मला स्वतःसाठी काही नको, मला तुमच्यासाठी हवं आहे. मी पदावर नाही. मी आज तुमच्या पालकत्वाच्या भूमिकेत आहे. मला कशाचीही आवश्यकता नाही, असं पंकजा मुंडेंनी सांगितलं आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.