HW News Marathi
Covid-19

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांना कोरोनाची लागण

मुंबई | महाराष्ट्रात दररोज कोरोना रुग्ण संख्या ५० ते ६० हजारांच्या पुढे आढळण्यास सुरुवात झाली आहे. सामान्य लोकांसोबत नेत्यांनाही कोरोनाची लागण होण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. अमोल मिटकरी यांनी स्वत: सोशल मीडियावर कोरोना झाल्याची माहिती दिली आहे.

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूकीत अमोल मिटकरी यांनी जोरदार सभा घेत भाजपचा समाचार घेतला होता. अमोल मिटकरी यांनी २ दिवसांत जवळपास २० च्या वर राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी सभा घेतल्या होत्या. दरम्यान, २ मेला पंढरपूर मंगळवेढ्यात राष्ट्रवादी भाजपचा करेक्ट कार्यक्रम करणार की भाजप बाजी मारणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोना नियंत्रणासाठी लोकप्रतिनिधींनी शासन आणि नागरिकांमधील दुवा म्हणून भूमिका बजावावी !

News Desk

पतसंस्था चळवळीला बळकटी देण्याचा प्रयत्न करणार | जयंत पाटील

News Desk

‘कोरोना’शी लढताना विकास कामांवर परिणाम होणार नाही याची खबरदारी घ्या | अजित पवार

News Desk