HW News Marathi
महाराष्ट्र

“चंद्रकांतदादांचे 200+चे स्वप्न भंगताना पाहून खूप वेदना झाल्या”, राष्ट्रवादीने चंद्रकांत पाटलांना डिवचलं

मुंबई | राज्यात निवडणूकीच्या निकालाची रणधूमाळी सुरु आहे. पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणूकीचे निकाल काही वेळात स्पष्ट होताना दिसतील. भाजपने या निवडणूकीत बाजी मारलेली दिसून येत आहे आणि राष्ट्रवादी पिछाडीवर असलेली पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे पश्चिम बंगालमध्ये भाजप पिछाडीवर असलेले पाहायला मिळत आहे. यावरुनच राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना डिवचले आहे.

“चंद्रकांत दादांचे पश्चिम बंगालमधील 200+ चे स्वप्न भंगताना पाहून खूप वेदना झाल्या” असं म्हणत राष्ट्रवादीचे विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना डिवचले. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजप 100 च्या आसपास जागा मिळवण्याची शक्यता आहे, तर तृणमूल काँग्रेसने 185 हून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे.

काय आहे अमोल मिटकरींचे ट्वीट?

“चंद्रकांत दादांचे पश्चिम बंगालमधील 200+ चे स्वप्न भंगताना पाहून खूप वेदना झाल्या. भाजपचे अनेक महादिग्गज प. बंगालमध्ये आले, मिथुनदापण आले, सगळे व्यर्थ गेले. 4 वरुन 84 वर जागा आल्या, हे बोलायला राज्यातील भाजप नेत्यांना जागा शिल्लक ठेवली आहे. स्वप्न मात्र भंगले.” असे तिरकस बाण मिटकरींनी ट्विटरवरुन सोडले.

 

शरद पवारांकडून ममता बॅनर्जींचे अभिनंदन

“या विस्मयचकित करणाऱ्या विजयासाठी मी तुमचे अभिनंदन करतो. आपण भविष्यात लोकांच्या कल्याणासाठी एकत्रपणे काम करणे सुरु ठेवुयात. तसेच कोरोनाच्या संकटाचाही मिळून मुकाबला करुयात” असे ट्वीट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन करणाऱ्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ओबीसी परिषदेसाठी काँग्रेसचे नाना पटोले जाणार पवारांच्या बारामतीत!

News Desk

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला भीषण अपघात, सुखरुप बचावले

Aprna

नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करणे आपले प्रथम कर्तव्य! – उद्धव ठाकरे

Aprna