HW News Marathi
महाराष्ट्र

चंद्रकां(ता) की कहानी ये माना है पुरानी, अमोल मिटकरी यांचा पाटलांवर अप्रत्यक्ष निशाणा

मुंबई | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत राज्यात मध्यावधी निवडणुका होण्याची परिस्थिती असल्याचं भाकीत केलं होतं. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी कवितेतून अप्रत्यक्षरीत्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे. “चंद्रकां(ता) की कहानी ये माना है पुरानी, ये पुरानी होकर भी बडी लगती है सुहानी”,कृपया कोणीही याला राजकीय वळणावर नेऊ नये सहज आठवलं म्हणून पाठवलं.., असे ट्विट करत त्यांनी चंद्रकांत पाटील यांना टार्गेट केले आहे.चंद्रकांत पाटील हे सत्तेची स्वप्न पाहतायतं ही नेहमीची गोष्ट आहे पण त्यांच ते स्वप्न कधीचं पु्र्ण होणार नाही असं अमोल मिटकरींनी एचडब्ल्यू मराठीशी बोलताना सांगितलं.

महाराष्ट्र राज्य सध्या कोरोनाच्या संकटात आहे अशा परिस्थितीत महाविकासआघाडी चांगलं काम करतीये,हे सरकार ५ वर्षे टिकणारं असा विश्वासही अमोल मिटकरींनी व्यक्त केला आहे.सध्या निवडणुका घेण्याची राज्याची आर्थिक परिस्थिती तर नाहीचं परंतु भाजपचं सत्ता स्थापनेचं स्वप्नही पु्र्ण होणार नाही असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“हा शेतकर्‍यांच्या ताकदीचा विजय आहे”- रविकांत तुपकर

News Desk

‘भाजपाच्या जन आशीर्वाद यात्रेमुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण’, संजय राऊतांची टीका!

News Desk

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहाटे सहा वाजता केली पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी

News Desk