HW News Marathi
महाराष्ट्र

‘त्या’ प्रकरणावरून अमृता फडणवीसांचा विद्या चव्हाण यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी भाजपा महाराष्ट्र सोशल मीडिया प्रभारी जितेन गजारिया याला अटक करण्यात आली आह. तर दुसरीकडे त्याने केलेल्या टिप्पणीवर राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. मात्र, हा निषेध व्यक्त करताना त्यांनी या प्रकरणात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अमृता फडणवीस यांना ओढलं. बरं झालं रश्मी ठाकरेंना राबडी देवींची उपमा दिली. त्यांना जर फडणवीसांच्या पत्नीची उपमा दिली असती तर ‘डान्सिंग डॉल’ अशी प्रतिमा झाली असती, असं विधान विद्या चव्हाण यांनी केलं होतं. त्यानंतर अमृता फडणवीसांनीही यावरून चव्हाण यांच्यावर हल्ला चढवला आहे. त्याचबरोबर चव्हाण यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.

अमृता फडणवीसांनी विद्या चव्हाण यांच्याविषयी ऐकरी भाषा वापरत ट्विटरच्या माध्यमातून टीका केली आहे. फडणवीस आपल्या ट्वीटमध्ये म्हणाल्या, “आपल्याच सूनेच्या आणि पुरोगामी स्त्रियांच्या चारित्र्याचा जी करते अपमान, ती आहे राष्ट्रवादी नेता विद्याहीन चव्हाण, आता कोर्टातच जाऊन साफ करावी लागेल, तिने पसरविलेली सगळी विषारी घाण! विद्या चव्हाण मानहानी नोटीस वाच आणि सुधार स्वतः ला, मगच मिळेल तुला निर्वाण!”, असेही अमृता फडणवीसांनी म्हटले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी मानहानीच्या दाव्याची प्रत देखील ट्वीट केली आहे.

काय म्हणाल्या होत्या विद्या चव्हाण?

जितेन गजारीयाने रश्मी ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह ट्विट करत त्यांची तुलना राबडी देवींशी केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना चव्हाण म्हणाल्या, “हे सर्व प्रकरण पाहून मला एक मजेदार किस्सा आठवला. जितेन गजारीयाने जर राबडीदेवीचं उदाहरण दिलं असेल, तर रश्मी ठाकरे खूपच नशीबवान आहेत. कारण ती घरदार व चूलमूल सांभाळणारी एक संसारी स्त्री होती. तिला बिहारची मुख्यमंत्री होण्याचं भाग्य मिळालं. बरं झालं फडणवीसांच्या पत्नीची उपमा दिली नाही. नाही तर ती नुसतीच डान्सिंग डॉल अशी लोकांची प्रतिमा झाली असती. निदान रश्मी ठाकरेंची तशी वाईट प्रतिमा नाहीये. हे मला भाजपवाल्यांना सांगावंसं वाटतं. तुमच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने काय काय गुण उधळलेत, त्याविषयी ट्विट केले तर बरं होईल”, अशा शब्दात त्यांनी अमृता फडणवीसांवर निशाणा साधला होता.

‘डान्सिंग डॉल’ वर विद्या चव्हाण यांचे स्पष्टीकरण

दरम्यान, चव्हाण यांनी अमृता फडणवीसांवर केलेल्या वक्तव्यानंतर राजकारण तापल्याचे पहायला मिळत आहे. यावरून वाद निर्माण झाल्यानंतर चव्हाण यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देखील दिलं आहे. टीव्ही 9 मराठीसोबत बोलताना त्या म्हणाल्या, “माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीला मी वाईट काही बोलले नाही. अमृता फडणवीस या चांगल्या नृत्य करतात म्हणून मी त्यांना डान्सिंग डॉल असे म्हटले. त्यांच्या व्हिडिओवरूनच मी तसं म्हणाले. त्यामुळे त्यांना एवढ्या मिरच्या झोंबण्यासारखं काहीही झालेलं नाहीये. तरीही त्यांना जर राग आला असेल, तर त्यांनी तो काढावा. मी त्याला सामोरं जायला तयार आहे, असं विद्या चव्हाण म्हणाल्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#SushantSinghRajput : आज महाराष्ट्र सरकारला झटका मिळणार आणि सुशांतच्या कुटुंबाला न्याय मिळणार – राम कदम

News Desk

संजय राऊतांचा जामीन रद्द होणार? पत्राचाळ घोटाळाप्रकरणी आज हायकोर्टात सुनावणी

Chetan Kirdat

आमचे गरिबांचे सरकार, गरिबांना बुलेट ट्रेनपेक्षा तीन चाकी रिक्षाच परवडते !

News Desk