HW News Marathi
महाराष्ट्र

अमृता फडणवीस यांनी महाविकास आघाडीला पुन्हा डिवचले

मुंबई | अनेकदा अमृता फडणवीस यांना आपण महाविकासआघाडी सरकारच्या विरोधात बोलताना पाहतो. अनेकदा सोशल मिडीयाच्या अकाउंट्स वरुन त्या टीका करत असतात. उत्तर प्रदेशमध्ये लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून चिरडून मारण्याच्या घटनेविरोधात महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी आज ‘महाराष्ट्र बंद’ पुकारला आहे. या बंदचे महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे नेते जोरदार समर्थन करत असून विरोधी पक्षाचे नेते मात्र या बंदला जोरदार विरोध करत जाहीर निषेध करत आहेत. हा बंद म्हणजे ढोंगीपणाचा कळस असून हा बंद म्हणजे सरकार पुरस्कृत दहशतवाद असल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी बंदवर टीका केल्यानंतर आता फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही ‘महाराष्ट्र बंद’ला जोरदार टोला लगावला आहे.

महाविकास आघाडी सरकारचा उल्लेख वसुली करणारे सरकार असा करत पुन्हा एकदा डिवचले

अमृता फडणवीस यांनी ट्विट करत महाराष्ट्र बंदवर टीका केली आहे. मला कोणी सांगू शकेल का की आज वसुली चालू आहे की बंद?, असा खोचक सवाल उपस्थित करत अमृता फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. या ट्विटच्या माध्यमातून फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारचा उल्लेख वसुली करणारे सरकार असा करत पुन्हा एकदा डिवचले आहे. आपल्या या ट्विटमध्ये त्यांनी ‘महाराष्ट्र बंद नही है’ असा हॅशटॅगही जोडला आहे. या द्वारे त्यांनी बंदला विरोध दर्शवला आहे.

नाना पटोले यांनी अमृता फडणवीस यांनी केलेल्या टिकेवर पलटवार करत प्रत्युत्तर

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अमृता फडणवीस यांनी केलेल्या टिकेवर पलटवार करत प्रत्युत्तर दिले आहे. वसुलीमध्ये कोण पुढे आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे. देशपातळीवर आणि देशातील ज्या ज्या राज्यात भाजपप्रणित सरकार आहे, त्या ठिकाणी वसुलीबाबत त्यांना (अमृता फडणवीस) माहिती आहे. म्हणूनच त्यांनी अशा पद्धतीने टीका करणारे ट्विट केले असावे अशा शब्दात पटोले यांनी अमृता फडणवीस यांना टोला लगावला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाऊ – बहिण एकत्र आले तर परमेश्वराला सर्वात मोठी पूजा घालेल | चंद्रकांतदादा पाटील

Adil

आता शरद पवार अन् अजित पवार येतील कि काय ?

News Desk

कशी होते कोरोनाची चाचणी ? आरोग्य विभागाने केला खुलासा

swarit