HW News Marathi
महाराष्ट्र

महिला दिनाच्या दिवशी अमृता फडणवीसांचे नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले!

मुंबई | माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमीच सोशल मीडियात चर्चेत असतात. त्या अनेक विषय घेवून गाणं प्रेक्षकांच्या भेटीसाठी घेऊन येत असतात. सोशल मीडियात नेहमीच त्यांच्या गाण्यांची जोरदार चर्चा होते. अनेकवेळा त्यांना नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगचा सामना करवा लागतो. पण मिसेस फडणवीसअशा ट्रोलिंगला त्यांच्या गाण्यातूनच सडेतोड उत्तर देत असतात. आता जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर त्यांचे नाट्य गीत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

अमृता फडणवीस यांचं ‘कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी…’ हे ८ मार्च रोजी महिला दिनी प्रदर्शित झालं आहे. मिसेस फडणवीस यांनी आपल्या फेसबुक अकौंटरवरून हे गाणं प्रेक्षकांसाठी शेअर केलं आहे. अल्पावधीतच त्याला पसंती मिळाली आहे. काही दिवसांपूर्वी अमृता यांनी आठ मार्चला आपलं नवीन गाणं रिलीज होणार असल्याची माहिती दिली होती. ट्रोलर्सना तयार राहण्याचाही इशाराही त्यांनी त्यावेळी दिला होता. जेव्हा ती संघर्षपथावर निघाली तेव्हा तिला – कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी…. तिने मात्र जगाला दाखवून दिले की तिच्या प्रगतीचा प्रवाह रोखणे शक्य नाही! ‘स्त्री शक्ती‘ला गौरवान्वित करणारे माझे नवीन गीत नक्की पाहा, ८ मार्च रोजी, जागतिक महिला दिनी!” असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं होतं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

परमबीर सिंग यांच्या स्वाक्षरी नसलेल्या ईमेल पत्राची सरकार शहानिशा करणार

News Desk

शिवसेनेचा मंत्री फडणवीसांना भेटायला तडफडत होता, निलेश राणेंच्या दाव्यावर उदय सामंत म्हणतात…

News Desk

…म्हणून राज ठाकरे मास्क घालत नसतील! – रामदास आठवले

News Desk