HW News Marathi
महाराष्ट्र

अमृता फडणवीसांचं भाऊबीजेच्या दिवशी भाऊरायांकडे ‘हे’ मागणं…

मुंबई | विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस भाऊबीजेच्या दिवशी एक गाणं पोस्ट करुन सगळ्या भाऊरायांना एक मागणं केलं आहे. “आज भाऊबीजेला माझ्या सर्व भावांना एकच मागणं आहे.. तिला शिकू द्या. जगण्याचा हक्क तिलाही घेऊ द्या. समाज भक्कम करायचा असेल तर तिला आधी सक्षम होऊ द्या. दिवाळीच्या शुभेच्छा देत असताना प्रत्येक भगिनीला समर्पित आहे माझे गीत तिला जगू द्या” असं म्हणत त्यांनी त्यांचं नवं गाणं ट्विट केलं आहे. फेसबुकवरही त्यांनी हे गाणं पोस्ट केलं आहे.

तिला शिकू द्या…जगण्याचा हक्क तिलाही घेऊ द्या…समाज भक्कम करायचा असेल तरतिला आधी सक्षम होऊ द्या. दिवाळीच्या शुभेच्छा देत असताना प्रत्येक भगिनीला समर्पित आहे माझे गीत-तिला जगू द्या…अमृता फडणवीस यांनी त्यांचं हे नवं गाणं स्त्रियांना समर्पित केलं आहे. दिवाळीच्या शुभेच्छा देताना त्यांनी स्त्री शक्तीचं महत्व पटवून दिलं आहे. या गाण्याच्या व्हिडीओत अमृता फडणवीस यांनी त्यांचा आणि त्यांच्या मुलीचाही फोटो वापरला आहे.

तसंच स्त्रिया या कशाप्रकारे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावत आहेत ते दाखवून दिलं आहे. स्त्री भ्रूण हत्या होतात, स्त्रियांना नाकारलं जातं, त्यांना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवलं जातं, त्यांच्यावर अत्याचार होतात हे सगळं टाळण्याचं आवाहन अमृता फडणवीस यांनी त्यांच्या नव्या गाण्यातून केलं आहे. समाज जागृतीच्या दृष्टीने त्यांनी त्यांचं नवं गाणं समोर आणलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मंत्री गुलाबराव पाटील थेट गिरीश महाजनांच्या घरी!

News Desk

“एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, तुटेपर्यंत ताणू नये!” – अनिल परब

News Desk

मुख्यमंत्र्यांना विनंती करतो, पांडुरंगाच्या महापूजेला येऊ नका, बंडातात्या कराडकरांची खोचक विनंती

News Desk