HW News Marathi
महाराष्ट्र

नॉटी पुरूषांच्या आचार विचाराची घाण घालवून…अमृता फडणवीसांचा अप्रत्यक्ष राऊतांना टोला

मुंबई | जगभरात आंतरराष्ट्रीय पुरूष दिवस साजरा केला जात आहे. पुरूष दिवसाचं निमित्त कायम वादग्रस्त विधान करणाऱ्या माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. “नॉटी पुरूषांच्या आचार विचाराची घाण घालवून महाराष्ट्र स्वच्छ करण्यासाठी मदत करा,” असं आव्हान करत अमृता यांनी राऊत यांना नामोल्लेख टाळत टोला लगावला आहे.

आज आंतरराष्ट्रीय पुरूष दिवस आहे आणि जागतिक शौचालय दिनही आहे. यानिमित्ताने मी देशातील सर्व पुरुषांना एक सर्वसामान्य स्त्री म्हणून आवाहन करते की, आपण सगळ्यांनी एकत्र येऊन वाईट विचारांच्या काही मोजक्या नॉटी पुरूषांच्या आचार विचारांची घाण फ्लश करून महाराष्ट्र स्वच्छ करण्यासाठी मदत करावी,” असं ट्विट करत नाव न घेता अमृता फडणवीस यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

नेमका वाद काय?

बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरण आणि अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण चर्चेत असताना अभिनेत्री कंगना राणावतने मुंबईची पाकव्याप्त काश्मीरशी तुलना केली होती. कंगनाच्या वक्तव्यावरून शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी कंगनावर टीका केली होती. “कंगना राणावत म्हणजे नॉटी गर्ल आहे,” असं राऊत म्हणाले होते. त्याचा खुलासा करताना “हरामखोर म्हणजे मराठी भाषेत बेईमान असा होतो. ती नॉटी म्हणजे खट्याळ मुलगी आहे आणि बेईमान आहे. असं मला वाटतं,” असंही राऊत म्हणाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाविकासआघाडी सरकार तीन चाकी, मात्र स्टेअरिंग माझ्याच हातात !

News Desk

गृहमंत्री पदाच्या बदलीच्या चर्चेवर कॉंग्रेसने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

News Desk

विनायक मेटे अनंतात विलीन; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतले अंत्यदर्शन

Aprna