HW News Marathi
महाराष्ट्र

“इस शहर में मिल ही जाएँगे, हर मोड़ पर गड्ढे-तालाब…”,अमृता फडणवीसांचा शायरीतून सरकारला टोला

मुंबई | माजी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसांची पत्नी अमृता फडणवीस या कायमच त्यांच्या अनोख्या वक्तव्याने, त्यांच्या गायनाच्या कलेमुळे चर्चेत असतात. आताही त्यांनी असंच एक चर्चेला कारण ठरणारं ट्विट केलं आहे. आताचचा ऋतु हा पावसाळ्याचा हा त्यामुळे संपुर्ण राज्यात जोरदार पाऊस सुरु आहे. मुंबईतही जोरदार पाऊस आहेच. पावसाने मुंबईची लगेच तुंबई होते. याच मुद्दावरुन शेरोशायरी करत अमृता फडणवीसांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

काय आहे अमृता फडणवीसांचं ट्विट?

अमृता फ़डणवीस यांनी या ट्विटमध्ये मागे भरलेल्या पावसाचा फोटे टाकत टीका केली आहे. ‘इस शहर में मिल ही जाएँगे, हर मोड़ पर गड्ढे-तालाब,पर ढूँढोगे तो मुजरिम एक ना मिलेगा जनाब!’, असे ट्विट त्यांनी केले आहे.

 

अखेर अमृता फडणवीसांनी घेतली लस !

जी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतातच. प्रत्येक विषयावर त्यांचे असे वेगळे मत असतेच. काही महिन्यांपूर्वी त्यांनी कोरोना लसीबाबत एक ट्विट केलं होतं. आपलं वय ४५ वर्षांपेक्षा जास्त नसल्याची त्यांनी खंत व्यक्त केली होती. दरम्यान, आता अखेर अमृता फडणवीस यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. आता १८ वर्षांवरील सगळ्यांना कोरोना लस घेता येणार असल्याचं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे अमृता फडणवीस यांनी लस घेतली आहे.

या आधी काय केलं होतं ट्विट?

अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं होतं. “आज मला माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच माझं वय 45 वर्षे किंवा अधिक हवं होतं असं वाटत आहे. कोरोनाच्या लसीकरणाची वाट पाहत आहे. कोरोना अधिक भयावह आहे” असं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. दरम्यान, कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी देश सज्ज झाला असून वेगाने लसीकरण सुरू आहे. केंद्र सरकारनं देशात 45 वर्ष वयोगटावरील सर्वांना लसीकरणाला परवानगी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संयम कधी सोडायचा माहित आहे, पण गरज पडेल तेव्हा तलवारी काढू – संभाजीराजे 

News Desk

अजित पवारांनी दिले खडसेंच्या पक्षबदलाचे संकेत

News Desk

नवी मुंबई विमानतळाला दिबांचे नाव देण्यासाठी एल्गार, ४ जिल्ह्यांत आंदोलन

News Desk