HW News Marathi
महाराष्ट्र

‘प्रवीण कलमे हे आव्हाडांचे सचिन वाझे’, किरीट सोमय्यांचा घणाघात..!

मुंबई। “ठाकरे सरकारचे १२ आमदार चौकशीचा फेऱ्यात आहेत. आता गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि प्रवीण कलमे ही जोडी पुढे आली आहे. प्रवीण कलमे हा जितेंद्र आव्हाडांचा सचिन वाझे आहे. मुख्यमंत्र्यांनी आव्हाडांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी”, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली. किरीट सोमय्या यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत आव्हाडांवर हा आरोप केला आहे.

“गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर एक मेसेज फिरत आहे. एखाद्याच्या मागे ईडी लागली की त्याचा काळ बदलतो. ठाकरे सरकारचे १२ आमदार चौकशीचा फेऱ्यात आहेत. Ed-कॅग अधिकाऱ्यांनी एका आमदारांची २ तास चौकशी केली होती. ईडीने जप्त केलेले SRA फ्लॅट डेव्हलप करायला दिले आहेत. आता जितेंद्र आव्हाड आणि प्रवीण कलमे ही जोडी पुढे आली आहे. जितेंद्र आव्हाड यांना माझा प्रश्न आहे. कोण हा कलमे त्याचा तुमचा संबंध काय हे सांगा” असंच आता थेट आव्हाडांना किरीट सोमय्या यांनी सवाल विचारला आहे.

जुलै २०२० मध्ये १०० टक्के लॉकडाऊन होता. ६ जुलै २०२० या दिवशी ८१ आरटीआय टाकले जातात. आणि त्याच्यावर जितेंद्र आव्हाड हे कारवाई करण्याचे आदेश देतात. आव्हाड यांना कोरोना झाला होता. ते बरे झाल्यावर त्यांनी प्रथम प्रवीण कलमे यांच्या अर्जावर सही केली. आव्हाड आणि कलमे ही नवीन वसुलीची जोडी आहे का? असा सवाल किरीट सोमय्यांनी विचारला आहे.

 

प्रवीण कलमे हे आव्हाडांचे सचिन वाझे

SRA चे ceo यांनी कर्मचारी नाहीत , असं सांगितल्यावर आव्हाड भडकले. 62 SRA प्रकल्पाची पाहणी कलमे याने सुरू केली. प्रवीण कलमे हा जितेंद्र आव्हाडांचा सचिन वाझे आहे. जितेंद्र आव्हाड कुठे पैसे पार्क करतात हे आम्हाला माहीत आहे. या वसुलीच्या जोड्यांना मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा आहे, असा आरोप किरीट सोमय्यांनी केला. त्या काळात १०० टक्के लॉकडाऊन होता. चार महिन्याचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. आणि १०६ व्या दिवशी जितेंद्र आव्हाड यांनी कलमे यांना माहिती देण्याचे आदेश दिलेत. Sra बाबतही काही कलकत्ता कंपन्याच्या मार्फत गुंतवणूक करण्यात आली आहे, असा आरोप सोमय्यांनी केला.आव्हाडांनीच कलमे यांनाच आरटीआय अर्ज करायला सांगितला आहे. आव्हाड यांची मुख्यमंत्र्यांनी हकालपट्टी करावी , अशी माझी मागणी आहे. आपल्याकडे किती जोड्या आहेत हा माझा मुख्यमंत्र्यांना सवाल आहे. असेदेखील किरीट सोमय्या म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तुम्ही मोरासोबत फोटो काढा किंवा घोड्यावर बसा… पृथ्वीराज चव्हाणांचा मोदींवर निशाणा

News Desk

आपण कांदा निर्यातबंदी केली तर पाकिस्तानला त्याचा फायदा होईल, रोहित पवारांचा इशारा

News Desk

#Coronavirus : संचारबंदीचे उल्लंघन, पोलिसांकडून १२२ जणांवर गुन्हे दाखल

swarit