HW News Marathi
Covid-19

रुग्णांचे देवदूत म्हणजे आमदार ‘निलेश लंके’!

डॉ.कपिल झोटिंग | राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी कोरोना रुग्णांसाठी कोविड सेंटर उभारले आहे. हे केवळ त्यांच्यासाठी सेंटर नसून स्वतः लंके तिथे राहतात. त्यांच्या याच कामगिरीचा एक आढावा डॉ कपिल झोटिंग जे राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत त्यांनी निलेश लंके यांच्याबद्दल सुंदर लिखाण केले आहे. काय लिहिले आहे जाणून घेऊया.

काय लिहिले आहे लेखात?

कोरोनाचा सगळीकडे हाहाकार माजला आहे,सगळीकडे कोरोनाच्या बातम्या येत असताना सध्या महाराष्ट्रात आमदार निलेश लंके यांच्या चर्चेने एक सकारात्मकता पसरत आहे. होय मी त्याच आमदारांविषयी बोलतोय की सध्या प्रत्येक घरात,सोशल मीडियावर ज्यांची चर्चा चालू आहे त्या निलेश लंके साहेबांविषयी.राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरचे आमदार निलेश लंके यांचे सध्या कौतुकास्पद कार्य चालू आहे.

एक सामान्य घरातला सामान्य तरुण पक्षाच्या आमदाराला भिडतो आणि पक्षाचा प्रमुख त्याची दखल घेतो.तो तरुण तावातावाने पक्ष सोडतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल होतो.तो तरुण मुंबईला रॅली काढतो तर अख्खा हायवे जाम होतो आणि त्या तरुणाची चुणूक दिसून येते.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फक्त आणि फक्त त्या तरुणाचे काम बघून स्थानिक दिग्गजांना डावलून त्या तरुणाला विधानसभेचे तिकीट देते.

काय आश्चर्य सामान्य जनतेच्या आशीर्वादाच्या आणि पाठिंब्याच्या जोरावर तो तरुण प्रचंड मतांनी निवडून येतो.आमदार जरी झाले तरी आमदार निलेश लंकेचा तोच न बदललेला स्वभाव आणि न बदललेली राहणी लोकांना भावते.पायात स्लीपर आणि त्यांचं साधं राहणीमान लोकांना आपलेसे वाटते.

आमदार निलेश लंके यांनी त्यांच्या मतदारसंघात भाळवणी येथे ११०० बेड चे सुसज्ज असे कोविड सेंटर उभारले आहे आणि त्याला आदरणीय शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिर असं नाव दिलंय.आज त्या कोविड सेंटर च्या माध्यमातून ते हजारो रुग्णांची सेवा करत आहेत आणि अनेक रुग्णांचे शुभेच्छारुपी आशीर्वाद त्यांना भेटत आहे.

जे काम अनेक प्रस्थापित नेत्यांना जमलं नाही ते काम आमदार निलेश लंके यांनी करून दाखवलं आणि याची चर्चा फक्त मतदारसंघात च नव्हे तर तमाम राज्यभरात त्यांच्या कार्याची चर्चा चालू आहे.विशेष म्हणजे भाजपचे ही अनेक खासदार,आमदार,कार्यकर्ते त्यांच्या कार्याची प्रशंसा करताना दिसत आहे.

आमदार साहेब स्वतः प्रत्येक रुग्णाची आपुलकीने,काळजीने तपासणी करून चौकशी करतात. रुग्णांना स्वतः धीर देतात आणि आपला आमदार आज आपल्यासोबत आहे,स्वतः आपल्याला धीर येतोय याचा सकारात्मक परिणाम तिथल्या रुग्णांमध्ये दिसून येत आहे.रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी जात आहेत.

आमदार निलेश लंके यांनी उभारलेल्या कोविड सेंटरमध्ये रुग्णाला पौष्टिक जेवण,नाष्टा यासोबतच मनोरंजनाची ही सोय केलेली आहे.तिथे मोठ्या स्क्रिनवर वेगवेगळे मनोबलवर्धक कार्यक्रम दाखवले जातात.दररोज वेगवेगळ्या महाराजांच्या कीर्तनाची सोय त्यांनी कोविड सेंटरमध्ये केलेली आहे.रुग्णांना काही कमी जास्त पडू नये म्हणून आमदार साहेब स्वतः तिथे हजर असतात,स्वतः तिथेच आराम करतात.

रात्री रात्री २-३ वाजता काही वाटलं तर रुग्णांना जाऊन धीर देतात आणि रुग्णांना रुग्ण न समजता आपल्या परिवारातील सदस्य समजून आपुलकीने सेवा देत आहेत आमदार साहेब. खरंच एका सामान्य घरातून येऊन आमदार झालेल्या निलेश लंके यांनी महाराष्ट्रासमोर एक आदर्श उभा केला आहे.

आज महाराष्ट्रातील नेत्यांनी त्यांच्याप्रमाणेच कार्य करून कोरोनाशी दोन हात करायला हवे असे महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेची प्रतिक्रिया आहे. आमदार साहेब तुमच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा. स्वतः ची काळजी घ्या ही विनंती कारण तुम्हाला अजून खूप समाजसेवी कार्य करायचे आहे आणि महाराष्ट्र गाजवायचा आहे.

लेखक :

डॉ.कपिल झोटिंग

प्रदेश उपाध्यक्ष

राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया,

महा.राज्य

9767854315

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लाॅकडाऊनमध्ये अडकलेल्या लोकांना मूळगावी जाण्यासाठी ११ मेपासून मोफत एसटी प्रवास

News Desk

देशात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सलग दुसऱ्या दिवशी मोठी घट, कोरोनामुक्तांचे आकडे वाढले

News Desk

अमेरिका भारताला व्हेंटिलेटर्सची मदत करणार | डोनाल्ड ट्रम्प

News Desk