HW News Marathi
महाराष्ट्र

IPL खेळाडूंना घेऊन जाणारी बस फोडली; मनसेचे पुन्हा ‘खळ्ळ खट्याक’ सुरू

मुंबई | मनसे आता पुन्हा एकदा ‘खळ्ळ खट्यॅक’ करण्यास सुरुवात केली आहे. मनसे वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी काल (१५ मार्च) रात्री मुंबईत आयपीएलची बस फोडल्याची घटना घडली आहे. आयपीएलच्या खेळाडूंची वाहतूक करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बसेसचे काम मुंबईच्या व्यावसायिकांना न दिल्यामुळे मनसे आक्रमक पवित्रा घेत बस फोडली. मनसे काल रात्री ११ ते ११.३० वाजताच्या सुमारास ताज हॉटेलसमोरील बस फोडली. या प्रकरणात मनसे वाहतूक सेनेच्या उपाध्यक्ष प्रशांत गांधी यांच्यासर काही पदाधिकाऱ्यांना कुलाबा पोलिसांनी अटक केली आहे. 

आयपीएलच्या खेळाडूंना वाहतूक करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बसेचे राज्यातील वाहतूकदारांना हे काम दिले जात नाही. आणि राज्यातील व्यावसायिकांना डावलून बाहेरच्या व्यापाऱ्यांना हे काम दिले जाते. यासंदर्भात आयपीएल आयोजक आणि सरकारकडे विनंती करूनही यात काही बदल झालेला दिसत नाही. यामुळे मनसेने आक्रमक पवित्रा घेतल्याची माहिती मनसे वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक यांनी दिली आहे. 

आयपीएलचा १५ वा सिजन २६ मार्चपासून सुरू होणार आहे. आयपीएलचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्या २६ मार्चला होणार आहे. आयपीएलचा पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये खेळणार आहेत. आयपीएलचा अंतिम सामना २९ मेला होणार आहे. यंदाच्या आयपीएलचे सामने मुंबईत वानखेडे, ब्रेबॉर्न तर नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर सामने खेळणार आहेत. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सुरक्षा कमी करण्याचा  निर्णय हा सरकारचे “खुजेपण” दाखवणारा – मनसे 

News Desk

जाणून घ्या १० वी-१२ वीचा निकाल कधी जाहीर होणार

News Desk

नारायण राणे अजूनही हऱ्या-नाऱ्याच्या भूमिकेत, विनायक राऊतांची पुन्हा टीका!

News Desk