HW News Marathi
Covid-19

पुण्यात एका MPSC उत्तीर्ण तरुणाची आत्महत्या ! नोकरी न मिळाल्याचा होता तणाव

पुणे । पुण्यातील फुरसुंगी परिसरात राहणाऱ्या स्वप्निल लोणकर या MPSC परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या २४ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. MPSC ची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्याने नैराश्यातून स्वप्निलने गळफास घेऊन आत्महत्या केली. अधिकारी होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या या तरुणाने केलेल्या आत्महत्येमुळे राज्यात आता खळबळ उडाली आहे. आपल्या आत्महत्येपूर्वी स्वप्नीलने लिहिलेली सुसाईड नोट मन हेलावून टाकणारी आहे. स्वप्निलने या सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे की, “मी घाबरलो, खचलो मुळीच नाही. फक्त मी कमी पडलो. माझ्याकडे वेळ नव्हता, MPSC मायाजाल आहे यामध्ये पडू नका.”

पोलिसांनी या तरुणाच्या आत्महत्येबद्दल दिलेल्या माहितीनुसार, “स्वप्निल सुनील लोणकर असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून तो फुरसुंगी इथला राहणारा आहे. स्वप्निलच्या वडिलांची शनिवार पेठेत प्रिंटींग प्रेस आहे. बुधवारी नेहमीप्रमाणे स्वप्नीलचे आई-वडील प्रेसमध्ये गेले होते. तर स्वप्निलची बहिण बाहेर गेली होती. दुपारी घरी येऊन स्वप्निल कुठेच दिसत नसल्याचे पाहून त्याच्या बहिणीने त्याच्या खोलीत जाऊन पाहिले. यावेळी स्वप्निलने गळफास घेतल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती बहिणीने तातडीने आई वडिलांना दिली. त्यानंतर लगेचच स्वप्निलला जवळच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी स्वप्नीलला मृत घोषित केले. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आल्याचे हडपसर पोलिसांनी सांगितले.”

२०१९ साली झालेल्या MPSCच्या पूर्व व मुख्य परीक्षांमध्ये स्वप्नील उत्तीर्ण झाला होता. मात्र, कोरोनास्थितीमुळे दीड वर्षांपासून मुलाखत झालेली नव्हती. तसेच त्याने २०२० मध्येही पू्र्व परीक्षा दिली. त्यामध्येही तो उत्तीर्ण झाला. विविध जिल्ह्यातील निर्बंधामुळे मुख्य परीक्षा झालेली नाही. या तणावातूनच आपण आत्महत्या केल्याचे स्वप्निलने आपल्या सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. स्वप्नील आपले अभियांत्रिकीचे शिक्षण देखील पूर्ण केल्यानंतर MPSC परीक्षेची तयारी करत होता. आता अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या या तरुणाच्या आत्महत्येला नेमकं कोण जबाबदार ? असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बीडमध्ये महाराष्ट्र दिन व कामगार दिना निमित्ताने धनंजय मुंडेंनी ध्वजारोहण करून दिल्या शुभेच्छा

News Desk

राज्यातले कोरोनाग्रस्त रूग्ण होतायतं बरे ! कस्तुरबा मध्ये १२ जणांची टेस्ट निगेटिव्ह

Arati More

दिलासादायक ! राज्यात २४ तासांत ४० हजारांहून अधिक जण कोरोनामुक्त

News Desk