मुंबई | माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी नेते अनिल देशमुखांना ईडी कडून समन्स पाठवणियात आला होता. त्यांचा ठावठिकाणा माहित नाही, असं ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. एएनआयने ही बातमी दिली आहे. एएनआयला ईडीतील त्यांच्या सुत्रांनी अनिल देशमुख संपर्कात नसल्याचं सांगितलं आहे. काही दिवसांपूर्वी देखील अनिल देशमुख नॉट रिचेबल असल्याच्या चर्चा होत्या. त्यामुळे अनिल देशमुख नेमके कुठे आहेत? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
We are not able to connect with him (Anil Deshmukh). We don't know where he is. His exact location is not known. We are waiting for today's Supreme Court order. We hope he will cooperate with the investigation after today's order: ED Sources pic.twitter.com/6MeWxaMP24
— ANI (@ANI) August 3, 2021
आजही चौकशीला हजार राहणार नाही
१०० कोटी वसुली प्रकरणामुळे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे अडचणीत सापडलेले आहेत. या प्रकरणी त्यांना सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडीकडून समन्स बजावण्यात आला आहे . तसेच त्यांचा – मुलगा ऋषीकेश यांना देखील समन्स बजावण्यात आला आहे . त्यांना आज सकाळी ११ वाजता मुंबईच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र तिसऱ्या समन्सनंतरही अनिल देशमुख हे ईडीसमोर चौकशीसाठी हजर झाले नाहीत.
तिसऱ्यांदा हे समन्स बजावण्यात आले आहे
राज्याचे गृहमंत्री या नात्याने अनिल देशमुख यांनी १०० कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केल्यानंतर, ईडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला.देशमुख यांना ४० कोटी रुपयांची खंडणी मुंबईतील बारमालकांकडून मिळाली असल्याची ठोस माहिती ईडीला मिळाली आहे. त्या पार्श्वभूमीवर, ईडीने देखमुख यांना याआधी तीन वेळा चौकशीसाठी समन्स बजावले होते. पण वेगवेगळी कारणे देऊन ते चौकशीसाठी हजर झाले नाहीत. त्यानंतर आता तिसऱ्यांदा हे समन्स बजावण्यात आले आहे.
काय आहे प्रकरण?
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचे आरोप केले आहेत. या आरोपांची सीबीआय आणि ईडी चौकशी करत आहे. ईडीने अनिल देशमुख यांना चौकशीसाठी चारवेळा समन्स बजावलं. मात्र, एकदाही अनिल देशमुख चौकशीला उपस्थित राहिले नाहीत. दरम्यान, एएनआयला ईडीने अनिल देशमुख संपर्कात नसल्याचं सांगितलं. “आमचा अनिल देशमुख यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. ते कुठे आहेत हे आम्हाला माहित नाही. त्यांचं नेमकं ठिकाण माहीत नाही. आम्ही आज सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची वाट पाहत आहोत. आम्हाला आशा आहे की आजच्या आदेशानंतर ते तपासाला सहकार्य करतील,” असं एएनआयने त्यांच्या सुत्राच्या हवाल्याने सांगितलं आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.