HW News Marathi
महाराष्ट्र

जळगाव वसतीगृह महिला अत्याचार प्रकरणी विधानसभेत गदारोळ, ४ सदस्यीय चौकशी समिती केली गठीत – अनिल देशमुख

मुंबई | जळगावातील महिला वसतीगृहात महिलांना कपडे काढून डान्स करायला लावल्याचा धक्कादायक प्रकाराचे पडसाद विधीमंडळात उमटले आहेत. भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला. तरुणींना कपडे काढून डान्स करायला लावलं गेले. त्याचा व्हिडीओ बनवला गेला. या गंभीर प्रकाराबद्दल दोषींवर कारवाई झाली पाहिजे. गृहमंत्र्यांना विनंती आहे की या पोलिसांचं निलंबन करावे, अशी मागणी श्वेता महाले यांनी केली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही घटनेची गंभीर दखल घेत दोषींवर नियमाने कारवाई होईल असं आश्वासन दिलं आहे.

जळगावमधील आशादीप वसतीगृहात घडलेला प्रकार दुर्दैवी आहे. घटनेची चौकशी करण्यासाठी चार उच्चस्थरीय अधिकाऱ्यांची समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल दोन दिवसात प्राप्त होणार आहे. त्यानंतर नियामानुसार दोषींवर कारवाई होईल, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत सांगितलं आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

जळगावच्या आशादीप वसतीगृहातील महिला आणि मुलींना पोलीस कर्मचारी आणि बाहेरच्या काही जणांनी डान्स करायला लावल्याचा प्रकार समोर आला होता. या महिलांनी घडलेल्या प्रकाराची शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांकडे तक्रार केल्याने ही संपूर्ण घटना उघडकीस आली. या महिलांनी आपल्यावर अन्याय, अत्याचार केला जात असल्याची तक्रार केली आहे. यामध्ये रात्री काही तरुण पैसे घेऊन या ठिकाणी प्रवेश करून अनैतिक कृत्य करत असल्याचं म्हटलं आहे.

इंदूबाई बहुउद्देशीय संघटनेच्या अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्त्या मंगला सोनवणे आणि जनायक फाउंडेशनचे फिरोज पिंजारी यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देऊन योग्य ती कारवाईची मागणी केली आहे. कारवाई न झाल्यास आंदोलनचा इशाराही त्यांनी दिला आहे.या घटनेचा संदर्भात आपल्याकडे काही जणांनी निवेदन दिले आहे. त्यानुसार आपण चौकशी समिती गठीत केली असून ही चौकशी समिती संपूर्ण घटनेचा तपास करून अहवाल देणार आहे. या अहवालानुसार कारवाई करण्यात येईल. अशा प्रकारची प्रतिक्रिया जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दीड दिवसांच्या बाप्पाला आज निरोप! भक्तांना अँटिजेन टेस्ट बंधनकारक

News Desk

ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी राज्य शासनाची सकारात्मक भूमिका – अजित पवार

News Desk

मलिकांच्या अटकेनंतर मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ अन् शरद पवारांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी तातडीची बैठक

Aprna