HW News Marathi
महाराष्ट्र

मलिकांच्या अटकेनंतर मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ अन् शरद पवारांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी तातडीची बैठक

मुंबई | राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. मलिकांना झालेल्या अटकेनंतर राज्यात राजकीय भूंकप झाला आहे.या पार्श्वभूमीवर वर्षा बंगल्यावर आज (२३ फेब्रुवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची तातडीची बैठक होणार असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच मलिकांना अटक झाल्यामुळे त्यांना त्यांच्या मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. कारण यापूर्वी संजय राठोड आणि अनिल देशमुख यांना देखील मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे आता मलिक देखील राजनामा देणार का?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

दरम्यान, शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीपूर्वी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची सिल्व्हर ओक निवासस्थानी बैठक बोलावण्यात आली आहे. मलिकांच्या अटकेनंतर आता राज्यात महाविकासआघाडी सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत मलिकांच्या अटकेसंदर्भात काय चर्चा होणार हे पाहाणे महत्वाचे असणार आहे. तर दुसरीकडे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मलिकांनंतर आता राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना अटक होईल, असे संकेत दिली आहे. मलिकांना कोणताही समन्स न देता ईडीकडून केलेल्या कारवाईवर  राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी व्यक्त केली आहे.

ईडीच्या अधिकाऱ्यांनी आज पहाटे ४.३० वाजता मलिकांच्या पोहोचले. ईडीच्या कार्यलयात मलिकांची सकाळी ७ वाजता घेऊन केले तर ७.४५ वाजल्यापासून कार्यलयात त्यांची चौकशी सुरू आहे. गेल्या ८ तासांच्या चौकशीनंतर मलिकांना ईडीने अटक केले आहे. मलिकांना मेडिकल चेकअपसाठी जे. जे. रुग्णालयात घेऊन ईडीचे अधिकारी रवाना झाले आहेत. झुकेंगे नही, और लढेंगें, अशी प्रतिक्रिया मलिकांनी ईडीच्या कार्यलयातून बाहेर येताना दिली आहे. मलिकांच्या अटकेनंतर त्यांच्या समर्थकांनी ईडी कार्यलया बाहेर घोषणाबाजी केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“आमचे तोंड उघडले तर…” देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

Aprna

शरद पवार रुग्णालयात पण सुप्रिया सुळेंनी ‘ब्रीच कॅंडी’च्या गेटवरुन पंढरपूरची सभा गाजवली

News Desk

‘सोबत राहून पाठीवर सुराच खुपसायचा ‘ नाना पटोलेंची उद्धव ठाकरे आणि अजित पवारांवर टीका

News Desk