HW News Marathi
Covid-19

गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण

मुंबई । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातून एक महत्त्वाची बातमी आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण झाली आहे. अनिल देशमुख यांनी स्वतः ट्विट करता याबाबतची माहिती दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये अनिल देशमुख म्हणतात की, “आज (५ फेब्रुवारी) माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे. तरी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे मी आवाहन करतो. लवकरच मी कोरोनावर मात करून पुन्हा आपल्या सेवेसाठी हजर होईल.”

राज्यातील कोरोनास्थिती काय ?

राज्यात कोरोनास्थिती आता बहुतांशी नियंत्रणात येत आहे. राज्यात गुरुवारी (४ जानेवारी) दिवसभरात २ हजार ७३६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे तर तब्बल ५ हजार ३३९ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. दिलासादायक बाब अशी की, कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्थलांतरितांसाठी विशेष रेल्वेने प्रवासाची केंद्रीय रेल्वे मंत्रालयाची परवानगी

News Desk

राज्यात आज कोरोना २,४८७ नवीन रुग्णांची नोंद, कोरोनाच्या ३६ हजार ३१ रुग्णांवर उपचार सुरू

News Desk

प्रताप सरनाईकांच्या पत्रावर चंद्रकांत पाटील म्हणतात, आम्ही हेच सांगत होतो !

News Desk