HW News Marathi
देश / विदेश

दिलीप वळसे पाटलांनी गृहमंत्रीपदाचा पदभार स्वीकारताच अनिल देशमुखांनी केले ‘हे’ ट्विट

मुंबई | मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केल्यानंतर या प्रकरणाची चौकशी CBIकडे वर्ग करण्यात आली आहे. या प्रकारानंतर अनिल देशमुख यांनी आपल्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला. तर आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील यांनी राज्याच्या गृहमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला आहे. याच पार्श्वभूमीवर आता राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलीप वळसे पाटील यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

दिलीप वळसे पाटील यांनी नुकताच राजच्या गृहमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला आहे. त्यानंतर अनिल देशमुख यांनी एक ट्विट केले आहे. आपल्या या ट्विटमध्ये अनिल देशमुख म्हणतात कि, “आज माझे स्नेही दिलीप वळसे पाटील यांनी गृहमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला. याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि नव्या जबाबदारीसाठी हार्दिक शुभेच्छा!” दरम्यान, याचसोबत राज्य सरकारकडून मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देखील देण्यात येणार आहे.

गृहविभाग हा नेहमीच चॅलेंजिंग राहिला आहे !

“गृहविभाग हा नेहमीच चॅलेंजिंग राहिला आहे. किंवा काटेरी मुकुट म्हणता येईल असाच हा विभाग राहिला आहे. कारण दैनंदिन घटना घडत असतात त्यामधून नवनवीन प्रश्न तयार होतात आणि त्याची सोडवणूक करावी लागते असेही दिलीप वळसे पाटील म्हणाले. दरम्यान अत्यंत स्वच्छ व पारदर्शक कारभार महाराष्ट्राला देण्याचा प्रयत्न राहणार आहे”, असेही दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.

उच्च न्यायालयाच्या निकालाला राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार !

मुंबई उच्च न्यायालयाने काल (५ एप्रिल) निर्णय दिला त्या निर्णयामध्ये जी काही प्राथमिक चौकशी सुरू आहे. त्यामध्ये राज्यसरकार संपूर्ण सहकार्य NIA, CBI या यंत्रणांना करेल असे सांगतानाच कालच्या उच्च न्यायालयाच्या निकालाला सुप्रीम कोर्टात राज्य सरकारच्यावतीने आव्हान देणार आहे. त्याबाबतचा राज्यसरकारने निर्णय घेतला असल्याचे दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. दरम्यान माध्यमांचे येत्या काळात सहकार्य हवे असे आवाहनही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#NirbhayaCase : आरोपी पवन गुप्ताची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

swarit

एअर इंडियाच्या डेटा सेंटरवर सायबर हल्ला, ४५ लाख प्रवाशांची क्रेडिट कार्डसह महत्त्वाची माहिती ‘लीक’

News Desk

1 मे नंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या लाल दिवा काढणार

News Desk