HW News Marathi
महाराष्ट्र

अनिल देशमुखांची ED कोठडी आज संपणार!

मुंबई। मुंबई हायकोर्टानं राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांना 12 नोव्हेंबरपर्यंत सुनावलेली ईडी कोठडी आज संपणार आहे. त्यामुळे अनिल देशमुखांना आता जामीन मिळणार का? हे आज समजणार आहे. अनिल देशमुख यांच्या ईडी कोठडीची मुदत शनिवारी 6 नोव्हेंबरला संपल्यानंतर पीएमएलए सत्र न्यायालयानं अनिल देशमुख यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मात्र, ईडीनं देशमुखांच्या न्यायालयीन कोठडीला आव्हान दिलं होतं. हायकोर्टानं अनिल देशमुख यांना 12 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली होती. दरम्यान आजच्या सुनावणीनंतर अनिल देशमुख सध्या ईडी कोठडीत असून ईडीनंतर सीबीआय कडून देखील अनिल देशमुखांवर कारवाई करण्याची शक्यता असल्याची माहिती आहे.

अनिल देशमुख यांच्यावर काय आरोप?

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंग यांनी 100 कोटींच्या खंडणी वसुलीचा आरोप केल्यावर त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर ईडीने अनिल देशमुख यांना चौकशीसाठी समन्स बजावले. तर परमबीर सिंग यांच्याविरोधात विविध ठिकाणी खंडणी वसुलीचे गुन्हे दाखल झाले. ठाणे पोलिसांनी सिंग यांना चौकशीसाठी बोलावले, पण त्यांनी काहीच प्रतिसाद न दिल्याने ठाणे पोलिसांनी सिंग यांच्याविरोधआत लुकआऊट नोटीस बजावली होती.

नेमकं काय आहे प्रकरण?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गंभीर आरोप केले होते. त्या पत्रानुसार, निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे हे क्राईम इंटेलिजन्सचे यूनिट हेड करत होते. गेल्या काही महिन्यांत गृहमंत्री अनिल देशमुखांनी कित्येक वेळेस वाझेंना त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलवले आणि दर महिन्याला 100 कोटी रुपये जमा करायला सांगितले. देशमुख वाझेंना म्हणाले की, मुंबईत 1 हजार 750 बार आणि रेस्टॉरेंट आहेत आणि त्यातल्या प्रत्येकाकडून 2 ते 3 लाख रुपये कलेक्ट केले तरीसुद्धा महिन्याला 40 ते 50 कोटी रुपये सहज उपलब्ध होतील. राहिलेली इतर रक्कम इतर मार्गांनी जमा करता येईल. देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या निवसस्थानी बोलवायचे. पोलिसांना ते सातत्याने सूचना द्यायचे. मला किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या बंगल्यावर बोलवायचे आणि पैसे गोळा करण्यासाठी टार्गेट द्यायचे


 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सध्या ‘मनसे’सोबत युती नाही, कार्यपद्धती बदलली तर युतीवर चर्चा करण्यासाठी तयार !

News Desk

‘सह्याद्री’ अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांची बैठक

News Desk

रायगडमधील एसटी बसमध्ये आयईडी बॉम्ब, जिल्ह्यात हायअलर्ट जारी

News Desk