HW News Marathi
महाराष्ट्र

अनिल परब यांनी दिले होते नारायण राणेंच्या अटकेचे आदेश!

मुंबई। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आल्याने सध्या राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आपत्तीजनक आणि समाजात तेढ निर्माण करणं विधान केल्याने नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांकडून अटक करण्यात आली. नारायण राणे यांना अटक करुन महाड कोर्टात हजर करण्यात आलं असता त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. मात्र यामुळे भाजपा आणि शिवसेनेत मोठा वाद निर्माण झाला आहे.

दोन वेळा त्यांना फोन आल्याने पत्रकार परिषद थांबवली

यादरम्यान वाहतूक मंत्री अनिल परब यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये अनिल परब पोलिसांना कोणताही उशीर न करता नारायण राणे यांना अटक करा असा आदेश देत आहेत. रत्नागिरीचे पालकमंत्री असणारे अनिल परब मंगळवारी पत्रकार परिषदेत बोलत असताना दोन वेळा त्यांना फोन आल्याने पत्रकार परिषद थांबवली होती.

अनिल परब काय म्हणाले होते?

पत्रकार परिषदेत फोनवर बोलणाऱे अनिल परब यांचं संभाषण यावेळी तेथील माईकमुळे ऐकू येत होतं. पहिल्या कॉलनंतर अनिल परब यांनी पोलीस अधिकाऱ्याला दुसरा फोन लावला.”हॅलो तुम्ही लोक काय करत आहात? पण तुम्हाला ते करणं गरजेचं आहे. तुम्ही त्यांना ताब्यात घेतलं आहे की नाही?….कोणती ऑर्डर ते लोक मागत आहेत? हायकोर्ट आणि सेशन्स कोर्टाने त्यांचा जामीन नाकारला आहे….मग पोलीस बळाचा वापर करा,” असं अनिल परब फोनवर बोलताना ऐकू येत होतं.

राणेंनी पत्रकार परिषदेमधून आपली भूमिका मांडली

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जन आशिर्वाद यात्रेदरम्यान मंगळवारी अटक करुन जामीनावर सुटका करण्यात आल्यानंतर आज राणेंनी पत्रकार परिषदेमधून आपली भूमिका मांडली. यावेळी राणेंनी मला कोणीही काहीही करु शकत नाही. मी तुम्हा सर्वांना पुरुन उरलोय असा इशारा विरोधकांना दिला. त्याच प्रमाणे राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलेल्या तीन वक्तव्यांचा संदर्भ देत त्या वक्तव्यांच्या वेळी गुन्हे दाखल का करण्यात आले नाहीत असा प्रश्न विचारला. यावेळेस राणेंना राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या भूमिकेसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी अगदी मोजक्या शब्दात या प्रश्नाचं उत्तर दिलं.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोल्हापुरातील जोरदार पावसामुळे राधानगरी, कोयनासह अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग

News Desk

राज्यात उद्याच होणार बहुमत चाचणी, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

News Desk

“कोण किती जातीवादी, एकदा महाराष्ट्राच्या जनतेला कळू द्या,” धनंजय मुंडेंचे राज ठाकरेंना आव्हान

Aprna