HW News Marathi
महाराष्ट्र

“अनिल परब हे रोज तेच शिळं बोलतात!”, पडळकरांचा परबांना टोला

मुंबई | “अनिल परब हे रोज तेच शिळं बोलत आहेत. आणि त्यांच्याकडे नवी सांगायला काहीच नाही. परबांनी आझाद मैदानात येऊन एसटी कर्मचाऱ्यांशी बोलावं,” अशी मागणी भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचं सर्वेसर्वा शरद पवार, राज्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचं परिवहन मंत्री अनिल परब यांच्यात आज (२२ नोव्हेंबर) वरळीत नेहरू सेंटरमध्ये जवळपास चार तास चर्चा झाली.

महाविकासआघाडी सरकार वेळकाढूपणा आणि चालढकल करत आहे. परब दररोज एकच बोलत असतात. परंतु, त्यांचे वक्तव्यात काहीच फरक नसतो. ते वेगळे असे काहीच सांगत नाही. परबांची आज महत्त्वाच्या नेत्यांसोबत बैठक झाली असली तरीही कालचेच वक्तव्यं त्यांनी ते करत असेल. तर या बैठक घेण्यात काहीच अर्थ नाही, अशी भूमिका पडळकरांनी मांडली. आंदोलन करत असेले कर्मचारी त्यांचं आहेत ना, मग परबांनी येथे येवून कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधावा. आंदोलन करत असेलं कर्मचारी काय कुठलं अतिरेकी इथे येऊन बसलं आहेत का?, आंदोलन करत असलेले कर्मचारी त्यांचं पालकत्व परबांकडे आहे ना. परबांनी सरळ कर्मचाऱ्यांशी बोलावं.”

“राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांनी २८ ऑक्टोबर पासून संप पुकारला आहे. आणि मुंबईतील आझाद मैदानावर गेल्या १३ दिवसापासून आंदोनल सुरू आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू असल्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांनाचं प्रचंड हाल होत आहेत. एसटी संपला २५ दिवस होऊन ही अद्याप तोडगा निघला नाही. हे सरकार निर्णयक्षम नाही आणि यांच्यात एकमत नाही,” असेही पडळकर म्हणालं.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनात भाजपचा एक गट घुसल्यानं…राऊतांचा भाजपवर गंभीर आरोप  

News Desk

भाजप-शिवसेनामधील संघर्ष सोडविण्यासाठी अमित शाह मुंबई दौऱ्यावर

News Desk

‘प्रशासनाचा दरार नसेल तर अधिकाऱ्यांवर हल्ले होतात’ – जितेंद्र आव्हाड

News Desk