राळेगणसिद्धी | ज्येष्ठ समाज समाजसेवक अण्णा हजारे यांचे आज (२ ऑक्टोबर) महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने राळेगणसिद्धी येथील पद्मावती मंदिरात उपोषणाला बसणार होते. परंतु अण्णाचे उपोषण रोखण्यासाठी सरकारच्या वतीने जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे राळेगणसिद्धीमध्ये दाखल झाले होते. लोकपाल, लोकायुक्ताची नियुक्ती आणि स्वामीनाथन आयोग या विविध प्रश्नाच्या मागण्यांसाठी अण्णा मंगळवारी सकाळी १० उपोषणाला सुरुवात करणार होते.
Anna Hazare who was scheduled to go on hunger-strike from today postpones the agitation after talks with Maharashtra minister Girish Mahajan. He was to sit on hunger over demand for appointment of Lokpal and welfare measures for farmers. pic.twitter.com/pf8IFdlGQc
— ANI (@ANI) October 2, 2018
महाजन आणि अण्ण यांच्यामध्ये जवळपास दोन तास चर्चा सुरू होती. अण्णाची राज्याचे मुख्मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनवरून चर्चा केली. या चर्चेनंतर अण्णांनी त्यांचे उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला. लोकपाल, लोकायुक्ताची नियुक्ती आणि स्वामीनाथन आयोग या विविध प्रश्नाच्या मागण्यांसाठी अण्णा उपोषणाला बसणार होते. सहा महिने उलटल्यानंतरही जनलोकपालची अंमलबजावणी न झाल्यामुळे अण्णांनी आक्रमक पवित्रा घेतला होता.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.