HW News Marathi
महाराष्ट्र

परमबीर सिंग यांच्या संकटात भर, दोन कोटी स्वीकारल्यामुळे गुन्हा दाखल

मुंबई | माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर काल मरीन लाईन पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली होती. अजून एक संकट परमबीर सिंग यांच्यावर कोसळल्याचं माहिती येत आहे. .ठाणेचे आयुक्त असताना खोट्या गुन्ह्यात अडकून एकाकडून ४.६८ कोटी रुपये उकळल्याप्रकरणी ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

२ कोटींची खंडणी मागितली

परमबीर सिंग यांच्यावर सध्या एकापाठोपाठ एक संकट कोसळत आहे. शरद अग्रवाल नावाच्या व्यक्तीकडून दोन कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी परमवीर सिंग यांच्याविरुद्ध कलम ३८४, ३८५, ३८८, ३८९, ४२०, ३६४ ए, ३४ ,१२० बी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परमबीर सिंग व्यतिरिक्त संजय पुनमिया, सुनील जैन, मनोज घोटकर आणि मनेरे यांचीही नावे आहेत. परमबीर सिंग हे ठाण्याचे पोलिस आयुक्त असताना मनारे हे त्यावेळी ठाण्याचे गुन्हे शाखेचे डीसीपी होते.

फसवणुकीचा गुन्हा दाखल

परमबीर सिंग यांच्यावर काल(२२ जुलै) मरीन लाईन पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. ठाणे पोलीस ठाण्यात आज(२३ जुलै) पुन्हा त्यांच्यावर खंडणीचा आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. बिल्डर श्याम सुंदर अगरवाल यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. केस मागे घेण्यासाठी आपल्याकडे खंडणी मागितल्याचा दावा अगरवाल यांनी केला आहे. त्यानंतर परमबीर सिंग यांच्यासह सहा जणांवर खंडणी आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. मुंबईतील मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. संजय पुनमिया आणि सुनील जैन यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला असून, हे दोघे परमबीर यांच्यासाठी खंडणी उकळायचे, असा आरोप आहे.

परमबीर सिंग यांच्यावर गुन्हा दाखल

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल यांच्या तक्रारीवरून मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआरमध्ये एकूण आठ जणांची नावं आहेत. त्यात परमबीर सिंह यांच्यासह इतर सहा पोलिसांचाही समावेश आहे. या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे. फिर्यादी यांच्या तक्रारीवरून आरोपी व इतर सहकारी साथीदार व संबंधित पोलीस अधिकारी यांच्या विरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना अधिकच्या विशेष गाड्या सोडा, शेलारांची मागणी

News Desk

महाराष्ट्राच्या बदनामीविरुद्ध लढलो म्हणून मला तुरुंगात टाकले तरीही मी तयार…

News Desk

पक्षातून बाहेर पडलो अन् माझ्या नावाचा जपच सुरु झाला !

News Desk