HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबई पाठोपाठ आता अमरावतीमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार!

अमरावती | मुंबईमध्ये आज(11 सप्टेंबर ) एक भयानक घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हदरून गेला आहे. यातच आता अमरावतीत देखील एक दुःखद घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलीला मारहाण करून तिचे लैंगिक शोषण करण्यात आले. ही घटना गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ९ सप्टेंबर रोजी उघडकीस आली. या प्रकरणी संशयित आरोपीस अटक करण्यात आली आहे. प्रज्वल एकनाथ जोगदंडे (वय २०) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

नेमकं काय घडलं?

पीडित १४ वर्षीय मुलगी व प्रज्वल यांची फेब्रुवारी महिन्यात ओळख झाली. ओळखीनंतर मैत्री व मैत्रिचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर प्रज्वलने पीडित मुलीला भेटायला बोलाविले. तो तिला दुचाकीवर बसवून एका निर्जनस्थळी घेऊन गेला.

पीडित मुलीला तेथे थांबायला लावून तो आपल्या एका मित्राला आणायला गेला. काही वेळानंतर तो मित्राला घेऊन परतला. मित्राला बाहेर उभे करून प्रज्वलने पीडित मुलीसोबत असभ्य वर्तन केले. त्यामुळे पीडितेने त्यास मनाई करून आरडाओरड केली. त्यावर प्रज्वलने तिला मारहाण करून लैंगिक शोषण केल्याचं समोर येतंय.

साकीनाका बलात्कार प्रकरण

मुंबईला हादरवून सोडणारी घटना आज(११ सप्टेंबर) साकीनाक्या परिसरात घडली आहे. एका ३६ वर्षीय महिलेवर एका इसमाने बलात्कार करून तिच्या गुप्तांगात रॉड घुसवला होता. त्या पीडितेवर घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचार चालू होते, मात्र उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणामुळे महाराष्ट्रात खळबळ माजली आहे. अनेक राजकीय नेते संताप व्यक्त करत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टवर चालवायचे आदेश दिले आहेत. मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी या प्रकरणात अधिक माहिती दिली आहे. हेमंत नगराळे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे.

21 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी

जखमी महिलेला पोलिसांनी राजावाडी रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर आरोपीविरोधात 307, 376 नुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणात मोहन या आरोपीला संशयावरुन ताब्यात घेतलं आहे. तो जोनपूरचा रहिवासी आहे. या आरोपीच्या अंगावर रक्ताचे डाग होते. न्यायालयात हजर केलं असता आरोपीला 21 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन केली आहे. पुढील एक महिन्यात हा गुन्हा उघडकीस आणू, असा दावाही मुंबई पोलिस आयुक्तांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यपाल भवन राजकीय अड्डा झाला नवाब मलिक यांचा आरोप!

News Desk

भरदिवसा काँग्रेस प्रवक्ता विकास चौधरींची गोळ्या झाडून हत्या

News Desk

महापौर किशोरी पेडणेकरांना पत्रातून दिली जीवे मारण्याची धमकी, अश्लिल भाषेचाही वापर

News Desk