HW News Marathi
महाराष्ट्र

मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणाची आत्महत्या!

जालना। मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणाने आत्महत्या केली आहे. मराठा आरक्षण नसल्यानं एका तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना जालना जिल्ह्यातल्या परतूर तालुक्यातील येणोरा गावात घडलीये.सदाशिव शिवाजी भुंबर असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव असून तो 22 वर्षांचा होता.’आरक्षण नसल्याने जीवनयात्रा संपवतोय’, अशी सुसाईड नोट लिहून त्याने आपल्या आयुष्याचा शेवट केला.

न्यायालयीन लढाईपर्यंत सर्व स्तरांवर ते प्रयत्नशील राहिले

संभाजीराजे हे सुरूवातीपासून मराठा आरक्षण लढ्यात सक्रिय आहेत. रस्त्यावरील आंदोलनांपासून ते न्यायालयीन लढाईपर्यंत सर्व स्तरांवर ते प्रयत्नशील राहिले आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्याची जबाबदारी कुण्या एकाची नसून सर्व पक्षांनी एकत्र येऊन यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची गरज संभाजीराजेंनी वेळोवेळी बोलून दाखवली आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पक्षीय हेव्यादाव्यांच्या पलिकडे जाऊन संभाजीराजे मोट बांधत आहेत.

खचून जाऊ नका, निराश होऊ नका

तर दुसरीकडे मराठा आरक्षण आपल्याला मिळणार आहे. तुम्ही खचून जाऊ नका, निराश होऊ नका, असे सांगत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा तरुणांना निराश न होण्याचे आवाहन केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्धव ठाकरे म्हणतात, मी चुकलो तर त्याला जबाबदार पवार…

News Desk

मुख्यमंत्र्यांकडून ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गा’ची पाहणी

News Desk

महिला पोलिस कॉन्स्टेबलची आत्महत्या

News Desk