HW News Marathi
देश / विदेश

काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांच्या पार्थिवावर हिंगोलीत होणार अंत्यसंस्कार

हिंगोली | राज्याच्या राजकारणातील काँग्रेसचा युवा चेहरा असलेल्या खासदार राजीव सातव यांच्या निधनाने शोककळा पसरली आहे. राजीव सातव यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली होती, पण त्यांच्या शरीरात नवा विषाणू सापडल्याने परिस्थिती नाजूक झाली होती. पुण्यात त्यांच्यावर उपचार सुरु असताना प्राणज्योत मालवली.

दरम्यान, त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार उद्या (१७ मे) हिंगोलीमध्ये होणार आहेत. त्यांच्या मातोश्री रजनी सातव यांच्याशी चर्चा झाल्यानंतर हिंगोलीत अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी दिली आहे.

काँग्रेसचे तरुण नेते आणि खासदार राजीव सातव यांच्या निधनानंतर राजकीय क्षेत्रातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. तरुण, उमद्या आणि दिलदार नेत्याला महाराष्ट्र मुकला अशा शब्दांत अनेकांनी श्रद्धांजली वाहिली आहे. राहुल गांधी यांचे विश्वासू सहकारी असलेल्या सातव याच्या निधनानंतर गांधींसह प्रियांका गांधी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज व्यक्तींनी ट्विट केले आहे.

राहूल गांधी यांचे ट्विट!

राहुल गांधी म्हणतात, माझा मित्र राजीव सातव यांना गमावल्याने मला फार वाईट वाटत आहे. काँग्रेसच्या आदर्शांना मूर्त रूप देणारे ते नेते होते. हे आपल्या सर्वांचे मोठे नुकसान आहे. मी सातव कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे. प्रियांका गांधी म्हणतात, ‘राजीव सातवसारखा एक तेजस्वी सहकारी आम्ही गमावला. मनापासून शुद्ध, प्रामाणिक, काँग्रेसच्या आदर्शांशी एकनिष्ठ आणि भारतीय लोकांसाठी समर्पित असा हा नेता होता. माझ्याकडे बोलण्यासाठी शब्द नाहीत, त्याच्या पत्नी आणि मुलांना हे दु:ख पेलण्याचे बळ मिळो.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#PulwamaAttack : जावेद अख्तर-शबाना आझमी देशद्रोही, सिद्धूची गाढवावरुन धिंड काढावी !

News Desk

गुजरातमध्ये हाय अलर्ट, पाकिस्तानी दहशतवादी समुद्रामार्गे करणार घुसखोरी

News Desk

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन

News Desk