HW Marathi
Covid-19 महाराष्ट्र मुंबई

बच्चन कुटुंबानंतर आता अभिनेते अनुपम खेर यांच्या घरातही कोरोनाचा शिरकाव…

मुंबई | कोरोना विषाणूचा शिरकाव अनेक अभिनेत्यांनासुद्धा झालेला पाहायला मिळत आहे. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींच्या घरातही शिरकाव केला आहे. बीग बी अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिनेता अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

आता त्यानतंर ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांच्या कुटुंबातील काही व्यक्तिंना देखील कोरोनाची लागण झालीय . अनुपम खेर यांनी ट्विटर वर एक व्हिडीओ शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे. खेर यांची आई, भाऊ, वहिनी, पुतणी यांना संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यांना उपचारासाठी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तेथे उपचार सुरु आहेत. अनुपम खेर यांचीही चाचणी घेण्यात आली. त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

 

Related posts

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंना ‘भारतरत्न’ द्या !

अपर्णा गोतपागर

जाणून घ्या… कर्जत जामखेडामधून रोहित पवार निवडणूक का लढणार

संभाजी भिडे गुरूजींना मुख्यमंत्री पाटीशी घालत आहेत | राजा ढाले

News Desk