HW News Marathi
महाराष्ट्र

महापालिका निवडणुकीत भाजप सोडून इतर पक्षांनी एकजूट व्हावं – शरद पवार

सोलापूर। शरद पवार यांनी सोलापूर दौऱ्यादरम्यान केंद्रातील भाजप सरकारवर टीका केली. केंद्र सरकारकडून सत्तेचा दुरुपयोग होत असल्याचा आरोप शरद पवारांनी केला. महापालिका निवडणुकीत भाजप सोडून इतर पक्षांनी एकजूट झाले पाहिजे, तिथे राष्ट्रवादी पक्षाचा सन्मान झाला पाहिजे, अन्यथा स्वतंत्र लढूया, असं शरद पवार म्हणाले. महागाईमुळे जनता जेरीस आली आहे. नेहरुंनी विकासाचा पाया रचला मात्र आताचं सरकार काय करतंय? दीडशे वर्ष पारतंत्र्यात असणाऱ्या देशात विकास नव्हता. नेहरुंनी पाया रचला. आज केंद्र सरकार काय करतंय? या सरकारला रेल्वेची जागा विकून खासगीकरण करण्यात रस आहे. या देशात सुई तयार होत नव्हती, आता इथे रेल्वे तयार होतात. मात्र त्याची विक्री आणि खासगीकरणाचा घाट आहे, असा हल्लाबोल शरद पवार यांनी केला.

शरद पवार काय म्हणाले?

बऱ्याच दिवसानी सोलापूरला आलो. संपूर्ण जगात संकट आले होते. कोरोनाचे प्रमाण कमी झाले. शासकीय यंत्रणांना पूर्ण श्रेय दिले पाहिजे.यात खास करुन डॉक्टर नर्स, आरोग्य विभाग यांना श्रेय आहे.मागील निवडणुकीत अनेक पद घेतलेले लोक पक्ष सोडून गेले. तरुणांना आत्मीवश्वास देणे गरजेचे होते म्हणून मी मागील विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी मी इथे सभा घेतले.आता ज्यांच्या हातात सत्ता आहे,त्याचा उपयोग वेगळ्या कारणासाठी केले जात आहे.दीडशे वर्ष पारतंत्र्यात असणाऱ्या देशात विकास नव्हते. आज केंद्र सरकार काय करतंयया सरकारला रेल्वेची जागा विकून खासगीकरण करण्यात रस या देशात सुई तयार होत नव्हती, आता इथे रेल्वे तयार होतात. मात्र त्याची विक्री आणि खासगीकरणाचा घाट आता सगळ्यात प्रश्न महागाईचा

पेट्रोल आणि डिझेल चे दर वाढत आहेतयामुळे सगळ्याच गोष्टी महाग होत असल्यामुळे सर्वसामान्य लोकांना त्रास

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

साताऱ्यातील हाफ हिल मेरेथॉनमध्ये एका धावपटूचा मृत्यू

Aprna

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव देशमुख यांचे निधन

News Desk

तौक्ते वादळाच्या परिस्थितीत अजित पवार मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षात ठाण मांडून 

News Desk