HW News Marathi
महाराष्ट्र

आजपासून दहावी बोर्डाच्या परीक्षेसाठी अर्ज भरण्यास सुरुवात

मुंबई। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने सन २०२२ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता १० वी बोर्डाच्या परीक्षेचे अर्ज आज (१८ नोव्हेंबर) पासून भरण्यास सुरुवात होणार आहे. १० वीच्या विद्यार्थ्यांनी www.mahahsscboard.in या वेबसाइटवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज भरावा, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केले आहे.
१० वी बोर्डाच्या परीक्षेसाठी नियमित, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेल खाजगी विद्यार्थी आणि श्रेणीसुधार व तुरळक विषय, आयटीआय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. तसेच माध्यमिक शाळांनी नियमित विद्यार्थ्यांची परीक्षा फॉर्म SARAL डाटाबेसवरून नियमित शुल्कासह १८ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर २०२१ या कालावधीत अर्ज भरायचे आहे. परिक्षेचं अर्ज शाळांमार्फत भरावे लागणार आहेत. यासंदर्भातील सर्व सूचना माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापकांना याबद्दलच्या सूचना दिल्या आहेत.
दरम्यान, तर माध्यमिक शाळांनी पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणी सुधार व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ट होणारे विद्यार्थी, आयटीआयद्वारे ट्रान्स्फर ऑफ क्रेडिट घेणारे विद्यार्थी यांची परीक्षा फॉर्म प्रचलित पद्धतीप्रमाणे १० डिसेंबर ते २० डिसेंबर २०२१ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने भरावयाची आहेत. विलंब शुल्कासह हे अर्ज २० डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ या कालावधीत भरता येतील. तर, माध्यमिक शाळांनी बँकेत चलनाद्वारे शुल्क भरावयाचा कालावधी १८ नोव्हेंबर ते गुरूवार, ३० डिसेंबर २०२१ असा आहे.
माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व प्री लिस्ट मंगळवार 4 जानेवारी 2021 रोजी जमा करावयाची आहे. आवेदनपत्रे नियमित शुल्काने भरावयाच्या तारखांमध्ये कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी कळविले आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

किरीट सोमय्या पायऱ्यांवरून पळताना पडले; पुण्यात शिवसैनिकांचा राडा

Manasi Devkar

कोकण दौरा राज्यपालांचा ,चर्चा सोबत बसलेल्या आशीष शेलारांची !

News Desk

“एसटी कर्मचाऱ्यांनो तुम्ही आमचेच, बाहेरचे नाहीत” मुख्यमंत्र्यांचे संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना भावनिक आवाहन

News Desk