HW News Marathi
महाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार वैभव पिचड भाजपमध्ये करणार प्रवेश ?

मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर हे शिवसेनेत आज (२५ जुलै) प्रवेश करण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. अहिर यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादीचा अजून एक आमदार भाजपच्या गळाला लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे पुत्र आणि आमदार वैभव पिचड भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

आमदार वैभव पिचड यांनी बुधवारी (२४ जुलै) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ बंगल्यावर जाणून भेट घेतली आहे. या भेटीच्या वेळी नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले राधाकृष्ण विखे पाटील हे देखील उपस्थित होते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वैभव पिचडही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे म्हटले जात आहे.

वैभव पिचड हे अहमदनगरच्या अकोले विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. तर मधुकर पिचड हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत. मधुकर पिचड हे राज्यात अनेक वर्ष मंत्री होते. राज्याच्या आदिवासी मंत्रालयाची जबाबदारी त्यांनी सांभाळली. मुधकर पिचड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्राने स्थापन केलेल्या समितीत उपमुख्यमंत्री अजित यांना मिळाले ‘हे’ स्थान

News Desk

संजय राऊतांनंतर सुप्रिया सुळेंचे मुलाखत कुणाल कामरा घेणार?

News Desk

काँग्रेस पक्षाचं शिवसेनेत विलगीकरण झालयं का? निरूपमांचा काँग्रेसला सवाल

News Desk