अलिबाग | रिपब्लिक टीव्हीचे संपादक आणि पत्रकार संपादक अर्णब गोस्वामी यांची अलिबाग न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी अलिबाग कोर्टाने सुनावली आहे. तसेच, फिरोज शेख आणि नितेश सरडा यांनाही न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात आज पोलीसांनी अर्णब गोस्वामी यांना अटक केली आहे. तसेच अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांनी त्यांना कठोर कारवाई केली जावी आणि न्याय मिळावा अशी मागणी केली आहे.
Anvay Naik suicide case: Republic TV Editor-in-chief Arnab Goswami and two others – Feroz Shaikh and Nitesh Sarda – sent to 14-day judicial custody by Alibag District Magistrate Court.
— ANI (@ANI) November 4, 2020
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करुन ही माहिती दिली.न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. अर्णब गोस्वामी यांना पोलीस कोठडी देण्याची ठाकरे सरकारची मागणी न्यायालयाने फेटाळली. अर्णब गोस्वामी यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. उद्या मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली जाईल. अर्णब गोस्वामी यांना न्याय नक्की मिळेल, असा विश्वास किरीट सोमय्या यांनी व्यक्त केला आहे.
Alibaug Court Rejected Thackeray Sarkar's demand for Police Custody of #ArnabGoswami … sent him for Magistrate/Judicial custody. Tomorrow hearing at Mumbai Highcourt. I am sure Arnab will get justice @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @BJP4India
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) November 4, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.