HW Marathi
महाराष्ट्र

आंदोलन मागे घेणार नाही, मराठा वैद्यकीय विद्यार्थी

मुंबई | वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत नाराज मराठा समाजातील विद्यार्थ्यी गेल्या ९ दिवसांपासून आझाद मैदानात आंदोलन करत आहेत. मराठा विद्यार्थी आणि राज्य शासनातील चर्चा निष्फळ ठरल्याने विद्यार्थी आणि त्यांचे नेते आंदोलनावर ठाम असल्याची संकेत मिळाले आहेत. विद्यार्थ्यांनी सरकारवर विश्वास ठेवावा, असे आवाहन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विद्यार्थ्यांना केले होते. मात्र विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला.

‘शासन लेखी आश्वासन देणार नाही, तसे आश्वासन दिल्यास कायदेशीरदृष्ट्या अडचण होऊ शकते’, असे देखील पाटील यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. यामुळे विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेण्यास नकार दिला. यापूर्वी वैद्यकीय व दंत पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत मराठा समाजाला आरक्षण लागू करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाची राज्य सरकारने दखल घेत, या प्रक्रियेला २५ मेपर्यंत मुदतवाढ दिली. याबद्दलचे परिपत्रक सरकारने काल (१४ मे) जारी केले.

शैक्षणिक वर्ष २०१९-२० च्या वैद्यकीय आणि दंत पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशांकरिता (एसईबीसी) आरक्षण लागू करता येणार नाही, असे आदेश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले होते. त्याला राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. परंतु उच्च न्यायालयाचे २ मे रोजीचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने ९ मे रोजीच्या त्यांच्या आदेशान्वये कायम ठेवले आहेत.

Related posts

पीएसआयच्या बंदुकीतून सुटली आणि दुस-या पीएसआयच्या पायात घुसली

News Desk

राज्यातील १५१ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर

Gauri Tilekar

Bhima Koregaon | भिमा कोरेगाव हिंसाचारातील पाचही आरोपींच्या नजरकैद वाढ, मुख्यमंत्र्यांनी केले निर्णयाचे स्वागत

News Desk