HW News Marathi
महाराष्ट्र

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना २०२०चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

मुंबई | ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या पुरस्काराची चर्चा सुरू होती की, महाराष्ट्र भूषण पुरस्कार नेमका कुणाला दिला जाईल. अखेर ख्यातनाम गायिका आशा भोसले यांना २०२० या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

काल (२५ मार्च) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीची बैठक पार पडली या बैठकीस समितीचे उपाध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख, राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, सांस्कृतिक कार्य सचिव सौरभ विजय हे शासकीय सदस्य तसेच अशासकीय सदस्य सहभागी झाले होते. निवडीनंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी आशा भोसले यांचे अभिनंदन केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कुस्तीपटूंना मानधनासोबत निवृत्तीवेतन, वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी प्रयत्न करणार! – चंद्रकात पाटील

Aprna

सचिन वाझेला दुसरं समन्स जारी, अनिल देशमुखांविरोधातील भ्रष्टाचाराच्या आरोपांची करणार चौकशी

News Desk

शुट आउट अ‍ॅंड हिमायतबाग: आरोपींना दहा वर्षांची सक्तमजुरी

News Desk