HW News Marathi
महाराष्ट्र

‘मला परकीयांनी पराजीत केले नाही तर स्वकीयांनीच केलं’ आशा बुचकेचं विधान!

मुंबई। शिवसेनेत असतांना पंचायत समितीवर भगवा फडकवून जिल्हा परिषदेत पाच सदस्य नेत न्याय देण्याची भूमिका कायम ठेवली. पक्ष निष्ठता कधीही सोडली नाही. मी कार्यकर्त्यांच्या जोरावर ७ निवडणूका लढले. परंतु मला परकियांनी पराजित केलं नाही. मला स्वकीयांनीच पराजित केलं, छत्रपतींना जसा स्वकीयांकडून त्रास झाला तसाच मलाही झाला”, असा आरोप भाजपात प्रवेश केलेल्या आशा बुचके यांनी केला आहे.आशा बुचके यांनी आज मुंबईत विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यश चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. भाजपचा पुणे जिल्ह्यात शिवसेनेला हा जोरदार झटका मानला जात आहे. यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

पंचायत समितीवर भगवा फडकवून जिल्हा परिषदेत पाच सदस्य नेत न्याय देण्याची भूमिका

“शिवसेनेत असतांना कार्यकर्ता केंद्रबिंदू माणून मी काम केलं. प्रत्येक निवडणूक माझी निवडणूक म्हणून काम केलं. माझा सरपंच झाला पाहिजे, माझा सद्स्य झाला पाहिजे, या भावनेतून काम केले. भाजपा माझा पिंड असल्यामुळे संघटना आणि संघटनात्मक काम हे रक्तातचं होतं. ते घेऊन कार्यकर्त्याला मोठं करत असतांना तो सदस्य तरी व्हावा, यासाठी वर्षाचे बारा महीने कष्ट केले. आणि जुन्नर नगरपरीषदेची निवडणूक काबीज केली. तसेच पंचायत समितीवर भगवा फडकवून जिल्हा परिषदेत पाच सदस्य नेत न्याय देण्याची भूमिका कायम ठेवली,

काहींच्या सांगण्याने पक्षातून हकालपट्टी होते

“विधानसभा निवडणूक हारली तरी देखील दुसऱ्या दिवशी लोकांचे आभार मानले, हे फक्त कार्यकर्यांच्या जोरावर करता आले. ज्याच्या पाठीमागे कार्यकर्ता असतो तोच खरा नेता होऊ शकतो. हे समीकरण कायम जुडवण्याचं काम मी केलं. पक्षाचा (शिवसेना) विश्वास मी विसरु शकत नाही. पण न्याय देत असतांना ज्यावेळी माझ्यासारख्या महिलेची काहींच्या सांगण्याने पक्षातून हकालपट्टी होते. मात्र या संकटात कार्यकर्त्यांनी माझी पाठ सोडली नाही”, असे आशा बुचके म्हणाल्या.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अजित पवारांना राष्ट्रवादीकडून वाढदिवसाचे अनोखे गिफ्ट…

News Desk

‘ओएनजीसी’चं जहाज बुडालं, २६० पैकी १४७ जणांना वाचवण्यात यश

News Desk

कोकण ते विदर्भातील जिल्ह्यांना यलो ॲलर्टक …पावसाचं कमबॅक ?

News Desk