HW News Marathi
महाराष्ट्र

“पालिकेच्या 132 अधिकाऱ्यांच्या बढतीचा प्रस्ताव शिवसेनेने का अडवला?” आशिष शेलारांचा सवाल

मुंबई | भाजप आमदार आशिष शेलारांनी शिवसेनेला सुनावलं आहे. मुंबई महापालिकेतील एससी, एसटीच्या 132 अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीवरून भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेला घेरलं आहे. या अधिकाऱ्यांच्या बदल्या का रखडवल्या आहेत? मंत्रालयातली बदल्यांप्रमाणे महापालिकेतही वसुली केली जात आ हे का?, असा सवाल आशिष शेलार यांनी केला आहे.

मंजुरीसाठी विलंब का करण्यात येतोय?

आशिष शेलारांनी ट्विट करत शिवसेनेला जाब विचारला आहे. “मुंबई महापालिकेतील अनुसूचित जाती, जमातीसह आरक्षणांच्या रिक्त पदांवर महापालिकेत सेवेत असलेल्या 132 अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याचा प्रस्ताव स्थापत्य समितीत मंजूर झाला. पण 4 सर्वसाधारण सभा घेऊनही सत्ताधारी शिवसेनेकडून या प्रस्तावाला मंजुरीसाठी विलंब का करण्यात येतोय?, असा सवाल शेलार यांनी केला आहे. चिटणीस पदावर शुभांगी “सावंत” यांना डावलून संगिता “शर्मा” यांना बढती देण्यात आली आहे. आता 132 मराठी अधिकाऱ्यांना पदोन्नती देताना पुन्हा अडवणूक करण्यात आली आहे. मंत्रालयातील बदल्यांप्रमाणे पालिकेत पण वसुली? मुंबईकर हो, हे पहा… अवतार मराठी माणसाच्या कैवाऱ्यांचे(?), मराठी अधिकाऱ्यांकडून वसुली करणाऱ्यांचे!”, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

100 ऐवजी 150 जागा वाढविण्यास परवानगी मिळविली

वैद्यकीय महाविद्यालयांना 10 वर्षे झालेली आहेत अशा सर्व शासकीय / महापालिका / खाजगी महाविद्यालयांनी अर्ज केल्यास अटी व शर्तींच्या अधिन राहून 50 % प्रवेश क्षमता वाढवुन देण्याचे धोरण जाहीर केले आहे. मुंबई महानगरपालिकेची वैद्यकीय महाविद्यालये 50 वर्षाहून अधिक जूनी आहेत. परंतू, यापैकी केवळ लोकमान्य टिळक, शीव रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालयाने वर्ष 2015 मध्ये 50 % जागा वाढीसाठी अर्ज करुन वर्ष 2016 पासून पदवीधर अभ्यासक्रमासाठी 100 ऐवजी 150 जागा वाढविण्यास परवानगी मिळविली आहे.

दुर्देवाने महापालिकेच्या अन्य वैद्यकीय महाविद्यालयातून 50% प्रवेश क्षमता वाढीसाठी साधा अर्जही केला गेला नाही ही बाब मुंबईतील वैद्यकीय क्षेत्राच्या दृष्टीने गंभीर व दुर्देवी आहे, असेही शिरसाट म्हणाले. तसेच या संदर्भातील पुर्वानुभव लक्षात घेता महापालिका आयुक्त व अतिरिक्त आयुक्त यांनी जातीने लक्ष घातल्याशिवाय वैद्यकीय महाविद्यालयांतील ढिम्म प्रशासन व प्रशासकीय अधिकारी हलणार नाही असे त्यांनी सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“पंकजा आणि प्रीतम मुंडेंनी कधी पदाची अपेक्षा केली नाही”,पंकजा मुंडेंनी नाराजीवर केलं भाष्य

News Desk

कोल्हापूराच्या पुराचा मुंबईकरांना धक्का, उद्या गोकूळचा दूध पुरवठा असणार बंद

News Desk

शिवसेनेला हात लावायचा नाही आमचं ठरलेलं आहे-  हसन मुश्रीफ

News Desk