HW News Marathi
महाराष्ट्र

पब,डिस्को,बार यांना सवलतींचा प्रसाद मात्र गणेशोत्सव बंदिवासात!

मुंबई।कोरोना महामारीच्या संकटाने गेल्या अनेक दिवसांपासून हाहाकार माजवलाय महामारीमुळे अनेकांचे जीव देखील गेलाय. मात्र आता कोरोनारूग्णांची आकडेवारी कमी होताना आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे राज्य सरकारने निर्बंध आता हळूहळू शिथिल देखील केलेत.

मात्र गेल्या वर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही राज्य सरकारने गणेश उत्सवही साधेपणाने साजरा करण्याचं आवाहन सर्व गणेशभक्तांना केलं आहे.

यावरून भाजपने राज्य सरकारवर आता टीका करायला सुरुवात देखील केली आहे. बार, पब, डिस्को यांना सवलतींचा प्रसाद आणि गणपती उत्सव बंदिवासात अशी स्थिती राज्यात निर्माण झाली आहे, असं म्हणत भाजप नेते आशिष शेलार यांनी टीका केली आहे. दरम्यान पुढे म्हटलं आहे की, राज्य सरकारने या मार्गदर्शक सुचनांबाबत पुनर्विचार केला पाहिजे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंतर ठेवणे वगैरे ठीक आहे परंतु किती फुटाच्या उंचीवरुन काय कोरोनाचा संबंध आहे. असा सवाल भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे.

गणेश मंडळांसाठी नियमावली

– सार्वजनिक मंडळांनी श्रींच्या ऑनलाईन दर्शनसाठी, केबल नेटवर्क,वेबसाईट, फेसबुक यारख्या माध्यमांची व्यवस्था करावी.

– सार्वजनिक गणेशोत्सव आणि घरगुती श्री गणेशांच्या मूर्तींची आगमन किंवा विसर्जन मिरवणूक काढू नयेत.

– विसर्जनावेळी पारंपरिक पद्धतीने होणारी आरती घरुनच करु येणे. विसर्जन स्थळी नागरिकांना जास्त वेळ थांबता येणार नाही.

– मंडपाबाबतचे धोरण यांच्याशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत.

– सार्वजनिक गणपतींच्या सजावटीत कोणतीही भपकेबाजी नसावी. सार्वजनिक मंडळांकरिता ४ फूटांची आणि घरगुती गणेश मूर्ती २ फूटांची असावी.

– पारंपरिक गणेशमूर्ती ऐवजी धातू,संगमरवरी मूर्तींचे पूजन करावे. शक्यतो शाडूच्या मातीच्या मूर्तीचे पूजन करावे.

– आरोग्य आणि सामाजिक विषयी संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित कराव्यात.

– मंडपात निर्जंतुकीकरण, थर्मल स्क्रिनींग सारख्या पर्यायाची व्यवस्था करावी.

– मंडपात दर्शनासाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन, मास्क,सॅनिटायझर पाळण्याकडे लक्ष देण्यात यावे.

– गणेश मूर्तींचे विसर्जन शक्यतो घरी किंवा कृत्रीम विसर्जन स्थळी करावे.

– सांस्कृतिक कार्यक्रमाऐवजी आरोग्य विषयक कार्यक्रम, रक्तदान शिबीरे यासारख्या कार्यक्रमाचे आयोजन करावे.

– आरती भजन, किर्तनाच्या कार्यक्रमात गर्दी होणार याची दक्षता घ्यावी.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सेंच्युरी रेयॉनमध्ये विषारी गॅस गळती, कामगाराचा गुदमरुन मृत्यू, ११ जण गंभीर

swarit

राज ठाकरेंच्या सभेसाठी पुण्यात मिळाले मैदान

News Desk

धक्कादायक! बीडमध्ये दहावीच्या विद्यार्थिनीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

News Desk