HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष पदासाठी नेते पोहोचले थेट दिल्लीत

मुंबई | मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष पदासाठी नेत्यांचं जोरदार लॉबिंग सुरु आहे. वर्षा गायकवाड, सुरेश शेट्टींसह कॉंग्रेसचे नेते दिल्लीत पोहोचले आहेत. मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची उत्स्तुकता असतानाच नेत्यांनी थेट दिल्ली गाठली आहे. अनेक गटांमध्ये विभागलेल्या मुंबई कॉंग्रेसमध्ये एकी घडवण्याचे आव्हान नव्या अध्यक्षांसमोर असणार आहे. मुंबई महानगरपालिकेत निवडणुकीत मुंबई कॉंग्रेसच पद महत्वाचं असणार आहे. संजय निरुपम यांनी राजीनामा दिल्यानंतर ८० वर्षांच्या एकनाथ गायकवाड यांच्यातडे मुंबई कॉंग्रेसचं प्रभारी अध्यक्षपद सोपवण्यात आलं आहे.

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड या त्यांचे वडील एकनाथ गायकवाड यांच्यासाठी लॉबिंग करत आहे तर अस्लम शेख हे अमरजित मनहंस यासाठी प्रयत्न करतात. अशोक चव्हाण यांनी भाई जगताप याच्यासाठी आग्रही असल्याची माहिती आहे. पुढील काही दिवसात मुंबई प्रदेश काँग्रेस पातळींवर संघटनात्मक बदल होणे अपेक्षित असून त्याआधी वर्षा गायकवाड, अस्लम शेख दिल्लीवारी करत लॉबिंग करत आहेत.

काँग्रेसचे प्रवक्ते चरणसिंग सप्रा तसंच माजी आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी यांची देखील मुंबई कॉंग्रेस अध्यक्षपदासाठी नावे चर्चेत आहेत. सुरेश शेट्टी हे दक्षिण भारतातील असून दक्षिण मतदारांवर आकर्षित करण्याचा विचार प्रयत्न आहेत. तसंच दिलेल्या कामांमध्ये सुद्धा आता दक्षिणात्य नेत्यांचे वर्चस्व अधिक दिसत आहे, याचा नेमका फायदा सुरेश शेट्टी यांना मिळतो का हे पाहणेही गरजेचे असणार आहे.

तर दुसरीकडे चरणसिंग सप्रा देखील उत्तर भारतातील नेत्यांच्या माध्यमातून मुंबई काँग्रेस अध्यक्षपद मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती आहे. भविष्यात मुंबई महापालिका निवडणुकीत महाविकासआघाडी एकत्रित निवडणूक न लढवता स्वतंत्र निवडणूक लढावी अशी काँग्रेसच्या काही नेत्यांची इच्छा आहे.

तर मुंबई महापालिकेची निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता आहे. त्यासाठी भाजप आणि शिवसेना यांना सक्षम चेहरा काँग्रेसला देणे अतिशय गरजेचे आहे.गेल्या दोन महापालिका निवडणुकीत काँग्रेसची नगरसेवकांची संख्या ५० वरून ३० पर्यंत आली आहे. काँग्रेसला लागलेली उतरती कळा भविष्यात थांबून महाविकासआघाडीमधील सत्तेचा योग्य उपयोग करत काँग्रेसची ताकद वाढवणे हे मोठं आव्हान मुंबई काँग्रेस अध्यक्ष समोर असणार आहे. त्यामुळे दिल्ली हायकमांड नेमकी काय भूमिका घेते, याकडे आता सगळ्यांचे लक्ष आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांना राजकीय नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली!

News Desk

इंदुरीकर महाराजांच्या अडचनीत वाढ, औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल

News Desk

मशिदीचे भोंगे हटवले नाही, तर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालीसा लावणार; राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा

Aprna